भक्तीच्या या श्रेष्ठतम नवव्या मार्गाचे, आत्मनिवेदन भक्तीचे महत्त्व अलाैकिक आहे हे सांगताना श्रीसमर्थ दाेन यथार्थ उदाहरणे देतात.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही सर्व पंचमहाभूते श्रेष्ठ आहेत; पण त्यातही जसे आकाश सर्वश्रेष्ठ आहे किंवा ईश्वराची अनेक रूपे व अवतार असले तरी त्यामध्ये जगदीश्वर सर्वश्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे भक्तीचे नऊही मार्ग उत्तम फलदायीच असले, तरीही त्या सर्वांमध्ये हा नववा आत्मनिवेदनाचा भक्तिमार्ग सर्वश्रेष्ठ आहे.या मार्गाने गेल्याशिवाय जन्ममरणाच्या ेऱ्यातून मुक्ती मिळू शकणार नाही, एवढे याचे महत्त्व आहे.मुक्ती चार प्रकारची मानली जाते. सलाेकता, समीपता, स्वरूपता आणि सायाेज्यमुक्ती. या चारींना मिळून मुक्तीचतुष्टय म्हणतात. पुढच्या म्हणजे चाैथ्या दशकातील शेवटच्या दहाव्या समासात श्रीसमर्थांनी मुक्तीच्या चारही प्रकारांचे निरूपण केले आहे.
मात्र या नवविधाभक्ती समासात ते या चारही मुक्तींकडे अंगुलीनिर्देश करून म्हणतात की, या चारही मुक्तींमध्ये सायाेज्यम ुक्ती सर्वश्रेष्ठ आहे. इतर तिन्हीं मुक्तींना ‘चळण’ म्हणजे ेरबदल आहे. पण सायाेज्यमुक्ती अविचल आहे.अगदी सर्व विश्वाचा नाश झाला तरी सायाेज्यमुक्ती शाश्वत राहते. चारीही मुक्तीत तिला जे श्रेष्ठत्व आहे, तसेच नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदनाचे श्रेष्ठत्व शाश्वत आहे, असे सांगून ते प्रत्येक भक्ताने ज्ञानमार्गाने जाऊन अंतिमत: आत्मनिवेदनाला प्राप्त व्हावे, असा आग्रह धरीत आहेत! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299