एकाचीं वचनें । कडू अत्यंत तीक्षणें ।।2।।

    10-Feb-2023
Total Views |
 
 

saint 
 
काेणावर कितीही वाईट परीणाम झाला किंवा समाेरच्याचे कितीही नुकसान झाले तरी दुष्ट वृत्तीचे लाेक त्यांच्या वाचेची धार कमी हाेऊ देत नाहीत. माझ्या लहानपणीची एक घटना आहे. शेजारचे कुटूंब त्यांच्या सुनेवर अत्याचार करायचे. एके दिवशी सासूने सुनेला क्षुल्लक कारणावरून मारले. तिचा खूप अपमान केला.लाेकांनी तिला नांव ठेवावे, तिची बदनामी व्हावी म्हणून माेठमाेठ्याने गर्दाही करू लागली. आम्ही लहान असल्याने फक्त पाहत हाेताे.पाहणाऱ्या प्रत्येकाला सुनेवर अन्याय हाेत आहे हे कळत हाेते, तरीपण काेणी कांही बाेलत नव्हता. तेवढ्यात एक शेजारी वयाेवृध्द तेथे आले. ते निश्चितच सुनेची बाजू घेतील व सासूला चाेप देतील, असा विचार मनात आल्याने आम्हाला आनंद वाटला. पण झाले उलटेच.
 
सासूचे खाेटारडे बाेल ऐकताच ते म्हणाले, अशा सुनेला घरातून हाकलून दिलं पाहिजे. या म्हाताऱ्याच्या जिभेनं त्या सुनेचं किती नुकसान केलं हाेतं, हे शब्दात सांगणं मला तरी शक्य हाेणार नाही. असाे, नंतर इतरांनी ती सासू कशी चुकत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. खरे म्हणजे आपली वाचा काेणाचे भले करू शकत नसली तरी चालेल पण काेणत्याही परीस्थितीत काेणाचे नुकसान करणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. महाराजांच्या अभंगाच्या मूळ अर्थासाठी गाथा वाचाणे आवश्यक आहे. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448