गीतेच्या गाभाऱ्यात

    10-Feb-2023
Total Views |
 
 
पत्र तिसरे
 

Bhagvatgita 
 
प्रश्न असा निर्माण हाेताे कीसारे जगच जर मिथ्या असेल अथवा ‘अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही!’ असा प्रकार असेल अगर सृष्टीचा विचार करणे म्हणजे ज्या स्त्रीला मूलच हाेणे श्नय नसेल तिच्या मुलाची पत्रिका करण्यासारखे आहे, अशी परिस्थिती असेल तर अमुक तऱ्हेने वागा, लाेकांवर उपकार करा, स्वार्थ साेडून द्या, परमार्थाकडे लक्ष द्याअसला उपदेश मिथ्या जगात करण्याचे कारण काय? एकदा एक हत्ती मागून पळत येत असताना लाेक भीतीने पळाले. आचार्य देखील पळून गेले.एकाने आचार्यांना विचारले- ‘‘जग मिथ्या आहे ना? मग हत्ती असताना तुम्ही का पळालात?’’ आचार्य म्हणाले- ‘‘यथा गजाे मिथ्या तथा पलायनमपि मिथ्या।’’ ज्याप्रमाणे हत्ती मिथ्या आहे त्याप्रमाणे पलायनदेखील मिथ्या आहे.
 
हे वकिली उत्तर झाले. असल्या उत्तराने तुझे समाधान हाेणार नाही. मिथ्यावादाबद्दल तुझ्या शंका मार्मिक आहेत.सखाेल अभ्यास केला म्हणजे तुला कळून येईल की- ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा सत्य व मिथ्या हे शब्द काही विशिष्ट अर्थाने वापरले आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. सत्याची व्याख्या अशी आहेसत्यं नाम अव्ययं नित्यं अविकारि तथैव च। सत्य म्हणजे जे कधी नाश पावत नाही, जे नेहमी कायम राहणारे आणि ज्याचे स्वरूप कधी पालटत नाही तमिथ्या म्हणजे जे अव्यय नाही, नाश पावणारे आहे, नेहमी कायम टिकणारे नाही व ज्यांचे स्वरूप पालटणारे आहे ते.
 
सत्य व मिथ्या ह्यांचे हे विशिष्ट अर्थ तू लक्षात घे म्हणजे ब्रह्म सत्य आहे व जग मिथ्या आहे ह्या वा्नयाचा अर्थ तुला कळू शकेल.ग्रीनने म्हटले आहे What is real is unalterable and what is alterable. सत्य म्हणजे कधीही न बदलणारे व मिथ्या म्हणजे बदलणारे.हे सर्वांना मान्य आहे कीजग बदलणारे, विनाशी आहे म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञान म्हणते की- जग मिथ्या आहे.नामरूपात्मक जगाच्या बुडाशी जे तत्त्व आहे त्याला भारतीय तत्त्वज्ञान ब्रह्म म्हणते. हे तत्त्व अव्यय आहे, नित्य टिकणारे आहे.
म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञान म्हणते की- ब्रह्म सत्य आहे.
 
Critique of Pure Reason या पुस्तकात कांट याने नामरूपात्मक जगाच्या बुडाशी असणाऱ्या द्रव्यास Thing in itself (वस्तुतत्त्व) असे नाव दिले आहे.विशिष्ट अर्थ लक्षात घेतले म्हणजे जग मिथ्या आहे असे म्हटल्याबराेबर भांबावून जाण्याचे कारण नाही.साेनाराकडे आपण एखादा दागिना माेडण्यासाठी घेऊन गेलाे म्हणजे ताे दागिना बिल्वर आहे का पाटली आहे का चपलाहार आहे, का चंद्रहार आहे, असल्या गाेष्टीला ताे किंमत देत नाही.त्याची दृष्टी साेन्याकडे असते. त्याच्या हिशेबी साेने सत्य व दागिना मिथ्या आहे. कारण, दागिन्याचे रूप बदलणारे आहे पण साेने टिकणारे आहे.