पत्र पहिले मानवी जीवन सहारा वाळवंटाप्रमाणे आहे. अव्यवहार्य कल्पना या त्या वाळवंटातील मृगजळाप्रमाणे आहेत. तत्त्वज्ञानाचे अनुभवसिद्धान्त हे मात्र सहारातील हिरवळीच्या जागेप्रमाणे असतात. या जागा लहान असल्या तरी त्या माणसाला विलक्षण सुख देतात. ‘युध्यस्व भारत’ ही अशीच एक हिरवळ आहे.तू सूक्ष्म विचार केलास म्हणजे तुला कळून येईल कीकृष्णाचा उपदेश सत्य-अहिंसेच्या विरुद्ध नाही.केव्हा केव्हा वरवरचा विचार व खरा विचार यात महदंतर असते. तुला ती प्रख्यात गाेष्ट ऐकून माहीत असेल.एकदा एक हिंदी कुटुंब अमेरिकेत गेले हाेते. फिरता फिरता ते एका चर्चच्या आवारात गेले. एक तरुण स्त्री एका थडग्याला वारा घालीत आहे असे त्यांनी पाहिले. ते थडगे तिच्या पतीचे हाेते. भारतीय नवरा आपल्या पत्नीला म्हणाला- ‘‘पाहिलंस, ही पतिव्रता आहे. आपल्या पतीच्या थडग्याला ती वारा घालत आहे.
चल, आपण तिचे सांत्वन करू.’’ ते हिंदी कुटुंब त्या बाईकडे गेले. नवरा त्या गाेऱ्या बाईस म्हणाल ा- ‘‘तुम्ही खऱ्या पतिव्रता आहात. तुमच्या पतिप्रेमाने आम्ही उभयता थ्नक झालाे आहाेत...’’ ती गाेरी बाई म्हणाली- ‘‘अहाे! मी वारा घालते आहे त्याचे कारण वेगळे आहे.माझा नवरा मरताना म्हणाला हाेता की- निदान माझे थडगं सुकेपर्यंत तरी दुसरं लग्न करू नकाेस. ते लवकर सुकावं म्हणून तर मी वारा घालते आहे.’’ त्या हिंदी कुटुंबाप्रमाणे पुष्कळ लाेक वरवरचा विचार करतात व म्हणतात- कृष्णाचा उपदेश सत्य अहिंसेच्या विरुद्ध आहे.तुला आता खरा विचार समजून आला असेल व त्यावरून तुझी खात्री झाली असेल कीकृष्णाचा उपदेश सत्य-अहिंसेच्या बाजूचा आहे.पतीपत्नीच्या जीवनात आरंभीचा काळ असा असताे की, त्या वेळी वाटत असते की, सर्वांत श्रेष्ठ रस म्हणजे शृंगार रस.
पण पुढे पुढे विचारी मनाला वाटू लागते की, तत्त्वज्ञानाचा विचार, उच्चार व आचार हाच सर्वश्रेष्ठ रस.
तू तत्त्वज्ञानाच्या प्रांतात आलीस व त्यामध्ये मनापासून रस घेऊ लागलीस हे पाहून मला वाटते की, साखरेहून गाेड झालं व साेन्याहून पिवळं झालं. असाे! तुला आणखीही काही शंका असतील तर माेकळेपणाने विचार.तुझा राम पत्र दुसरे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. जीवनातला खरा आनंद कशाने प्राप्त हाेताे, याबद्दल वाद आहे. मला वाटतं- जीवनातला खरा आनंद तत्त्वज्ञान अंगी बाणल्याने हाेताे.
तुला तत्त्वज्ञानाची गाेउी लागली व तत्त्वज्ञान अंगी बाणवण्याची तू खटपट करते आहेस हे पाहून फार आनंद झाला.गीतेमध्ये ज्ञानयाेग, कर्मयाेग व भ्नितयाेग यांचा समन्वय आहे व हा समन्वय करताना गीतेने भ्नितयाेगावर विशेष जाेर दिला आहे. तू असे लक्षात घे कीहृदयातल्या परमेश्वराची ओळख करून घेण्यासाठी उत्कृष्ट साधन म्हणजे नाम. आपण प्रथम नाम जिभेने घेताे. पुढे आपणाला अनुभव येताे की-