तियें अवधान द्यावें गाेठी। बाेलिजेल नीट मऱ्हाटी। जैसी कानाचे आधीं दृष्टि । उपेगा जाये।। 7.206

    28-Dec-2023
Total Views |
 
 

saint 
 
ज्ञानदेवांना मराठी भाषेचा लाेभ किती हाेता हे या ओवीवरून ध्यानात येते. या भाषेतील शब्दरूपी फळे अर्जुन चाखू लागल्यावर ताे स्वर्गसुखाला वाकुल्या दाखवू लागला. त्याच्या हृदयात श्रीकृष्णांविषयी प्रेम उचंबळून आले. या फळांचा स्वाद घेण्यासाठी त्याने ही रसाळ फळे चाखण्याची इच्छा केली.पण जिभेने त्याला स्वाद घेता आला नाही. म्हणून त्याने ह्या फळांना स्पर्शच केला नाही.तेव्हा अर्जुन मनात म्हणाला की, भगवंतांच्या मुखातील शब्द म्हणजे ताऱ्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब हाेय. खराेखरच हे शब्द नव्हतेच, तर आकाशाच्या एकावर एक पडलेल्या घड्याच हाेत. ह्यात बुडी मारली तरी मला अर्थाचा थांग लागणार नाही. तेव्हा या याेद्ध्याने भगवंतांना प्रार्थना केली. देवा, तुमच्या उच्चारातील काेणत्याही शब्दांचा अर्थ माझ्या मनावर बिंबला नाही. सिद्धांताचाउलगडा कधी नुसत्या श्रवणाच्या बळावर हाेईल का?
 
तुमच्या मुखातील शब्दसमूह पाहून विस्मयालाही विस्मय वाटला. मीही आश्चर्यचकित झालाे. व माझे अर्थाचे अनुसंधान सुटले. म्हणून भगवंता, आपण आणखी सुस्पष्ट निरूपण करावे.गुरुशिष्यसंबंधाची मर्यादा सांभाळून श्रीकृष्णांच्या हृदयाला आलिंगन देण्यासाठी अर्जुन पुढे सरसावला.गुरूंना कसे प्रसन्न करावे याची कला फक्त अर्जुनाला माहीत हाेती.अर्जुनाचा प्रश्न व भगवंताचे उत्तर यांचा सारांश संजय धृतराष्ट्राला नेमक्या शब्दांत कसा सांगणार? पण ज्ञानेश्वर मात्र म्हणतात की, श्राेत्यांनी कृपा करून नीट लक्ष द्यावे.कानांत शब्द पडण्यापूर्वीच दृष्टीचा उपयाेग हाेईल अशा सुंदर मराठी भाषेत मी गीतेचा भावार्थ सांगणार आहे.मालतीच्या ुलांच्या कळ्या वास घेताना सुखदायक वाटतात. पण त्यांच्या साैंदर्याने डाेळे सुखी हाेत नाहीत काय? याच साैंदर्याच्या डाैलाने नटलेल्या मराठी भाषेत मी गीतेचा भावार्थ सांगणार आहे.