ओशाे - गीता-दर्शन

    28-Dec-2023
Total Views |
 
 
 

Osho 
म्हणजे मग तुम्हाला अंतर्यामी जायची कटकट करायलाच नकाे. ते म्हणते, ‘कुठे चाललास बाबा ? मी पहारेकरी आहे एवढा.मीच सांगताे ना.मालकाला भेटायची काय गरज आहे ? ते दरवाजावर उभे असते पहारेकऱ्यासारखे आपणास म्हणते, ‘मीच सांगेन तुम्हाला आत जायची काय गरज आहे ? बसा इथेच ! सगळी उत्तरे मला झकासपैकी ठाऊक असतात, फुकट आत जायची झंझट कशाला करायची ती ?’ तर मनाला सांगून ठेवा.‘माफ कर बाबा ! तुझी उत्तरे ठेव तुझ्याबराेबरच, मला तुझ्या उत्तरांची काहीएक गरज नाहीये. तुझी शास्त्रे, तुझे शिष्यांत वगैरे तूच सांभाळून ठेव. मला जाऊ दे, आत काय आहे ते मलाच स्वत:ला समजावून घ्यायचे आहे.
 
मला तर कशाचाच पत्ता नाही.’ विचारा आणि आतला एक पडदा पडेल. एक पातळसा पडदा, फ्नत हलकासा पडदा असताे ताे एक.
ताे उलगडेल आणि शरीर वेगळे हाेईल आणि तुम्ही वेगळे व्हाल.एकदा का हा अनुभव आला की, शरीर वेगळे अन् मी वेगळा. इंद्रिये वेगळी अन् मी वेगळा. मग येताना पुन्हा चळत नाही. मग ती प्रभूतच रमून जाते. ती त्याला कधी साेडतच नाही. ती त्याच्याशी एकरुप हाेऊन जाते. मग तुम्ही काेठेही गेलात तरी ती प्रभू मंदिरातच असते.मग तुम्ही दुकानात गेलात तरी मंदिरच दुकानी पाेहाेचते. तुम्ही रस्त्याने जात असलात तरी आतून जाणून असता की तुम्ही प्रभूमध्येच स्थिर झालेला आहात.