आजही आपण अशा व्य्नती (उदा. बाबा आमटे) पाहताे. तप या अत्यंत कठीण व्रताची सवय बनून पुढील जन्मीही अशी व्य्नती तपस्वी म्हणूनच जन्म घेते.
बाेध : चांगल्या गाेष्टींच्या अभ्यासाने (सरावाने) ती गाेष्ट सवयीत रूपांतरित हाेते आणि जीवनही सुधारते. ही सवय आपला स्वभाव (सेकंड नेचर) बनून आपली आत्माेन्नती करते.पुण्यसंचय हाेत जाताे आणि व्य्नती केव्हातरी माेक्षाची धनी निश्चितच हाेते, या जन्मी नाही तर पुढील जन्मी. मात्र आयुष्यात अशी सवय न लावता, नुसती माैजमज्जाच केली, तर जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी काेणताच मार्ग शिल्लक राहत नाही.