लिंचीने म्हटले, ‘सावधान ! पहा बाेट कापले गेले आहे. तू नाही कापला गेलेला.जागृत रहा.संधी वाया घालवू नकाेस. नीट खाेलवर पाहून घे. बाेट कापलेले आहे तू नाहीस कापला गेलेला.’ लिंचीच्या आवाजात जरब हाेती. एक तर बाेट कापले गेल्याने आधीच विचार थांबलेले हाेते.आवाजातील जरबेमुळे ताे घाबरला, विचार कंपन एकदम थांबले.लिंचीसारखा दयाळू माणूस बाेटे कापण्यासारखे हिंसक कृत्य करील असे कधी काेणास वाटले नव्हते. हा विचारसुद्धा काेणाला पटला नसता. त्यातच पुन्हा त्याच्या आवाजातील धार, त्याच्या तिथे स्वत: उभा असलेला अवतार आणि त्याचे ते उडवलेले बाेट.
वर ताे शिष्याला म्हणताेय, ‘पहा बाेट कापले आहे, तुला नाही कापलेले.’ त्याचे डाेळे बंद झाले. त्याने आत पाहिले. त्याने लिंचीच्या पायी लाेटांगण घातले आणि म्हणाला, ‘धन्यवाद ! आज प्रथमच कळून आले की मी म्हणजे बाेट नव्हे.’ प्रत्येक इंद्रियाबद्दल अशी जागरूकता निर्माण झाली पाहिजे, की हे इंद्रिय म्हणजे मी नव्हे. बाेटे कापूनच जागे व्हायला हवे असे नाही. कधी बसून शांतपणे विचार करा. बाेट उचलून, ‘हे बाेट म्हणजेच मी आहे काय?’ बाेट तसेच वरती धरून ठेवा आणि स्वत:ला विचारा, ‘हे बाेट म्हणजेच मी आहे काय ?’ फार वेळ लागणार नाही आतल्या आतच.बाेटापासून काहीतरी गळून पडेल.