यांचा पहिला कुरुठा इंद्रियें। एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये। आधीं निर्दळूनि घाली तियें। सर्वथैव।। (3.268)

    31-Oct-2023
Total Views |
 
 

saint 
 
गलितगात्र झालेल्या अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्मास अनुसरून, युध्दास प्रवृत्त व्हावे म्हणून श्रीकृष्णांनी स्वधर्माची महती वर्णन केली. हा स्वधर्म वा हे कर्तव्य पाळताना ज्या अडचणी येतात त्यांचाही विचार भगवंतानी येथे केला आहे. आपली विविध इंद्रिये आणि त्यांचे विषय यांचा ार माेठा सूक्ष्म विचार गीतेत आला आहे.या इंद्रियविकारांना कसे स्वाधीन करून घ्यावे, त्यांना वळण कसे लावावे, हे श्रीकृष्ण येथे सांगतात.कामक्राेधादि विकारांमुळे खरे ज्ञान लाेपून जाते.चंदनाच्या झाडाला जसा सर्पाचा विळखा असताे, तसे हे विकार ज्ञानाला घेरून असतात.वास्तविक पाहिले असता ज्ञान हे स्वतंत्र आहे.त्याला कामक्राेध कसे झाकणार? पण रजाेगुणामुळे हे कामक्राेध बलवत्तर हाेतात व ज्ञानाला झाकून टाकतात. म्हणून आधी यांचा बंदाेबस्त करणे अगत्याचे आहे. तरच माणसाचे रागलाेभही कमी हाेतील.
 
हे कामक्राेध काेठे राहतात? तर इंद्रिये, मन, बुद्धी यांच्या आश्रयाने राहून हे विकार ज्ञानाला वेढून टाकतात. ज्ञानी पुरूषाला भुरळ घालतात. म्हणून अर्जुना, इंद्रिये व त्यांचे विषय ह्यांना तू स्वाधीन करून घे. स्थूल विषयांच्या पलीकडे इंद्रिये आहेत. त्यांच्या पलीकडे मन, त्यांच्या पलीकडे बुद्धी, त्याच्या पलीकडे ज्ञान असते.या आत्म्याला झाकून टाकणाऱ्या कामरूपी शत्रूचा नाश करावयास हवा. ह्या विकांराचे मूळस्थान आपली इंद्रिये आहेत. याइंद्रियांपासून इच्छा निर्माण हाेते व कर्म घडते. म्हणून या इंद्रियांना प्रथम आवरावे.एकदा इंद्रिये जिंकली गेली की मनाची विषयांकडील धावही कमी हाेते.कामक्राेधांचे नावही शिल्लक राहत नाही. सूर्यकिरणे गेली की मृगजळ जसे नाहीसे हाेते, त्याचप्रमाणे कामक्राेध स्वाधीन झाले की त्यांचा अविचार दूर हाेताे.