ओशाे - गीता-दर्शन

    09-Jan-2023
Total Views |
 
 

Osho 
 
प्रत्यक्ष नाहीत. आपले संबंध ज्याच्याशी प्रत्यक्ष आहेत त्याच्याशीच संबंध ताेडले जाऊ शकतात.अगदी सुलभतेने, सहजतेने.पण लाेक सुखापासून सुरू करत नाहीत आणि तेथूनच तर वेगळेपण अनुभवणे साेपे असते. सारे लाेक दु:खानं सुरुवात करतात, पण तेथून ते अलिप्त हाेऊ शकत नाहीत. म्हणून प्राय: असं बघायला मिळतं की दु:खी लाेक धर्माच्या शाेधाला निघतात. सुखी माणूस कधी धर्माच्या शाेधाला निघत नाही.माझे एक मित्र त्यांच्या एका मित्राला माझ्याकडे घेऊन आले. त्यांना आणायचंय असं कित्येक वेळा म्हणाले हाेते. पण ते यायला राजीच नसायचे. ते म्हणत, ‘मी सुखी आहे सगळ्या बाजूंनी.
 
आताच त्यांच्याकडे जायची काय गरज आहे?’ मग मी म्हटले, ‘तर मग थाेडं थांबा.’ कारण सर्वप्रकारे सुखी असणे कायमचे असू शकत नाही. थाेडं थांब. आणखी थाेडा वेळ थांबा. आणखी थाेडा वेळ जाऊ द्या. धैर्य बाळगा. लवकरच दु:ख येईल. अन् जाे म्हणताे, ‘आत्ता मी सर्वप्रकारे सुखात आहे, आत्ताच मी कशाला जाऊ?’ ताे दु:ख आल्यावर माझ्याकडे यायला राजी हाेईल. पण तेव्हा त्याचे माझ्याकडे येणे हे व्यर्थ हाेऊन जाईल. आत्ताच आल्याने काही हाेऊ शकते. कारण सुख हे बीज आहे तर दु:ख हे फळ आहे. सुखाच्या बियाण्याला नष्ट करणे फारच साेपे आहे. दु:खाचा प्रचंड, विराट वृक्ष खलास करणे फारच अवघड म्हणजे अश्नयप्राय आहे.