चाणक्यनीती

    09-Jan-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
2. अन्यचक्र : अस्मानी तथा सुल्तानी संकट म्हणजे नियमित निसर्गचक्र बदलून त्यात बदल झाल्यास, अतिवृष्टी, अवर्षण, गारांचा पाऊस, हिमवादळे, चक्रीवादळे, त्सुनामी, दुष्काळ यासारखी भयंकर संकटे येतात.यातून जीव वाचविण्यासाठी ती-ती जागा, प्रदेश साेडून जाणेच हिताचे असते. चाचेगिरी, डाके, जाळपाेळ-लुटालूट, दंगे, बाॅम्बस्ाेट, आग लागणे, महामारी, युद्ध आणि विकृत लाेकांच्या तावडीत सापडणे (स्मगलर्स, अतिरेकी, दहशतवादी इ.) हे नेहमीच जिवावर बेतणारे असते. म्हणून अशा व्यक्ती आणि क्षेत्रांच्या प्रभावाच्या बाहेरच राहावे. त्यांच्यापासून दूर निघून जावे.
 
बाेध : जीवघेण्या परिस्थितीपासून नेहमीच जीव मुठीत घेऊन पळून जावे. लक्षात ठेवावे. सगळ्यात महत्त्वाचे असते ते आपले जीवन. ‘शिर सलामत ताे पगडी पचास’