ओशाे - गीता-दर्शन

    06-Jan-2023
Total Views |
 
 

Tarunsagarji 
 
भ्रांतीचे कारण दु:ख नाही हे काेणालाही पटेल.पायात काटा टाेचला तर ताे मला नाही टाेचला असे जाणून घ्यायला काेणालाही बरेच वाटणार.आजारपण येतं, ते मला येत नसतं, मरण येतं ते माझं नसतं, हे मानायला काेणीही राजी हाेईल.नाही, दु:खामुळे अडचण नाहीये.. अडचण आहे ती सुखामुळे आहे. सुख म्हणजे मी नाहीये हे मान्य करायला आपण स्वत:च राजी नसताे. म्हणून दु:ख हा खरा प्रश्न नाहीये, प्रश्न आहे ताे सुखाचा. मी जिवंत आहे असं आपण म्हणालात तर मग मी मरणार असंही आपणाला म्हणावे लागेल. लक्षात घ्या, चूक मरण्यातून येत नाही तर ती जगण्याबराेबर येते. जगणं, मी जगताेय याच्याबराेबर ती येतेय.आणि जर ही चूक ताेडायची असेल तर ती जगण्यातून ताेडली पाहिजे, मरण्यापासून नाही.
 
पण लाेक मरण्यापासून ताेडण्याचा उपाय करतात.राेजच्या राेज घाेकत असतात-आत्मा अमर आहे, मी कधीही मरणार नाही. पण याचा सरळ सरळ अर्थ असा हाेताे, की जर आपण स्वत:ला जिवंत समजता आहात तर एक दिवस ‘मी मरत आहे’ हेही समजून घ्यावेच लागेल. कारण तीही दुसरी बाजूच आहे. पण बसून काेणीही असा विचार करीत नसतं की ‘मी जिवंत आहे कुठे?’ जर असा आपण विचार करायला लागलाे तर, आपण फारच घाबरून जाऊ. भ्रांती ताेडायची असेल तर येथूनच ताेडायला पाहिजे. जेव्हा सुख येतं तेव्हा तर मन एकदम राजी हाेतं - ‘मी सुखी आहे’ असं मानायला. जेव्हा काेणी फुलांचा हार घालते तेव्हा मला वाटतं ‘माझ्यात काही गुण आहे, म्हणून लाेक माझ्याच गळ्यात हार घालतायत.’