2. किशाेरावस्था : पाच वर्षांनंतर पुढील दहा वर्षांपर्यंतचा काळ हा खऱ्या अर्थात शिकण्याचा, चांगले संस्कार करण्याचा काळ असताे. पाच वर्षे प्रेम मि ळालेला बालक त्यासाठी ‘तयार’ असताे. तरीसुद्धा या काळात लाड करण्याऐवजी कठाेर बनून त्याला शिक्षा करणे, रागावणे, वेळप्रसंगी मारणे आवश्यक असते.
थापटून-थाेपटून एखाद्या घड्याला आकार द्यावे तसे. अर्थाने तेही प्रमाणाबाहेर झाले तर मुले काेडगी बनतात; कारण या वयात उनाडपणे वागून ताे बिघडूही शकताे. त्याला धाकात ठेवले तर ताे सरळ वागेल. या वयातही केवळ लाडच झाले तर मुलगाही त्याचा गैरायदा घेऊन हेकेखाेर, हट्टी बनू शकताे; वाया जाऊ शकताे. या वयात त्याच्या चुकांबद्दल त्याला शिक्षा झाल्यास कसे वागू नये हे त्याला कळते-शहाणपण येते.