नवविधा भक्तिमार्ग म्हणजे भक्तियाेगाने भगवंताकडे नेणारे नऊ रस्ते आहेत. यातील प्रत्येक मार्ग दुसऱ्यापासून वेगळा असला तरी ते तसे परस्परसंबंधी आहेत. यातील मार्गांचा क्रमही तसा चढत्या भाजणीप्रमाणे चढत जाणारा आहे.त्यामुळे दास्यत्वाने भ्नती करता करता भ्नत जेव्हा प्रगती पावताे तेव्हा त्या भ्नतीच्या आधारेच ताे परमेश्वराचा सखा बनताे. आपल्या कर्तृत्वाने यशस्वी हाेणाऱ्या पुत्राला पित्याने वात्सल्याने उचलून घेऊन हृदयाशी धरावे, तसे भगवंत आपल्या भ्नताला मैत्रीच्या प्रेमधाग्यात गुंफून घेताे.सख्यभ्नतीमध्ये भ्नत आपले स्थान विसरला नाही, तरी भगवंत मात्र आपले स्वामित्त्व विसरून मैत्र अंगीकारताे आणि आगळ्यावेगळ्या सख्यभ्नतीचा साक्षात्कार भ्नताला प्राप्त हाेताे.
देवाला जे जे प्रिय असते, तेकरावे, त्याला जसे आवडते तसेच वागावे.भावयु्नत भ्नती, भजन व कीर्तन, कथा निरूपण आणि प्रवचन हे देवाला आवडते तेव्हा ज्याला सख्यभक्तिमार्गाने जावयाचे आहे, त्याने हा क्रम अनुसरावा. असे झाले की आपाेआपच आपली जीवनधारा परमेश्वराच्या पायाशी एकरूप हाेते आणि त्याच्याशी अंत:करणपूर्वक सख्यत्व प्राप्त हाेते. हे प्राप्त झाल्याची खूण म्हणजे जे देवाला आवडते तेच आपणास आवडावे आणि आपले वागणेही तसेच घडावे ही आहे. अशा अवस्थेमध्ये भ्नत या परममैत्रीमुळे भगवंताशी अनन्य एकरूपच हाेऊन जाताे आणि वेगळेपणाने उरतच नाही.या एकरूपतेचे वर्णन करणारी एक लाेककथा आहे. हे सख्य प्राप्त झालेला भ्नत समुद्राच्या तीरावर वाळूतून चालत चालला हाेता.