ओशाे - गीता-दर्शन

    31-Jan-2023
Total Views |
 
 
 
 
Osho
त्याच्याहून जास्त विक्षिप्त आणखी काेणी असेल काय? आपणास जर विजय यात्रा करायची असेल, तर आधी ती स्वतः पासून सुरू झाली पाहिजे.स्वतःला न जिंकण्याचा अर्थ काय आहे? जर मी आपणास म्हटलं की, ‘आज आपण रागवायचं नाही’’ तर आज आपण रागावणार नाही. इतका आपला स्वतःवर ताबा आहे का?’ मी आपणास म्हणताे, पांच मिनिटं डाेळे झाकून बसा, फ्नत ‘राम’ हा शब्द आत येऊ द्यायचा नाही. असे आपण बसाल तर आपली आपल्यावर कितपत मालकी आहे ते आपल्याला कळून येईल.डाेळे झाका. अन् मी म्हणताे, राम हा शब्द आपल्या आत येता कामा नये. पण राम शब्द आत येऊ द्यायचा नाही.
 
एवढीसुद्धा ताकद आपली नाही. याच पाच मिनिटांत हा शब्द इत्नया वेळा येईल, की आयुष्यात तितका कधी आला नव्हता. एकदम रामाचा जप सुरू हाेईल.राम-जपाचा जाे काही फायदा आहे ताे हाेईल! पण स्वतःचा पराभव सिद्ध हाेईल. स्वतःवर आपला थाेडासुद्धा ताबा नाहीये.‘आत्मा’ याचा एक अर्थ आहे स्वतःची सत्ता, स्वतःच्या असण्यावर, ज्याची मालकी आहे. पडताळून पाहा बरं आपण किती कमजाेर आहाेत, कसे गुलाम आहाेत ते कळेल. आपली गुलामी इतकी आहे, की सगळीकडे द्वारे-दरवाजे, प्रत्येक वृत्ती, प्रत्येक वासना, प्रत्येक विचार याबाबत आपल्याकडे दुबळेपण, गुलामी भिनलेली आहे. स्वतःला फसविण्याने काही एक हाेणार नाही. तेव्हा एक तर तिथे स्वतःला जिंकण्याची आठवण दिली आहे.