गीतेच्या गाभाऱ्यात

    03-Jan-2023
Total Views |
 
पत्र तेहतिसावे
 

Bhagvatgita 
 
आम्हा पुरुषांसाठी दासबाेध आहे. दासबाेधात समर्थांनी भ्नतीवर जाेर दिला नाही म्हणून आम्ही त्यांचे नाव घेत नाही.’ पुन्हा मुद्दा आला. मी म्हटले- ‘दासबाेधाचा अभ्यास करा. आपल्या ग्रंथाचे तात्पर्य काय, रहस्य काय, मर्म काय, अभिप्राय काय, ते’ समर्थांनी पहिल्याच दशकांत पहिल्याच समासात सांगितले आहे. समर्थ म्हणतात- भ्नितचेनि याेगे देव। निश्चये पावती मानव। ऐसा आहे अभिप्राय। इये ग्रंथी।। भ्नतीमार्गातच देव पावताे असा दासबाेधाचा अभिप्राय आहे. असे समर्थ सांगतात व ‘चे’ घालून भ्नितमार्गावर जाेर देतात.’ हा आधार ऐकून जमलेले वारकरी म्हणाले- ‘साहेब, तुमचा आधार बिनताेड आहे. आता त्यापुढे आम्ही केव्हा केव्हा कधी कधी समर्थांचे नाव घेत जाऊ.’
 
तुझा राम पत्र चाैतिसावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. तू आपल्या पत्रात लिहितेसतुमच्या पत्रात तुम्ही अधून मधून आचार्य शंकराचार्यांच्याबद्दल विचार मांडले. आता लाे. टिळक व गीतारहस्य जरूरीपुरती माहिती करून घेण्याची मला फार उत्कंठा लागली आहे. या दृष्टीने आपण मला गीतेच्या गाभाऱ्यात काही तरी सांगा- *** लाे. टिळक व गीतारहस्य या विषयाचा विचार करताना तू हे प्रथम लक्षात ठेव कीइ.सन 1872 पासून टिळक गीता वाचू लागले. तेव्हा त्यांचे वय साेळा वर्षांचे हाेते. ज्ञानेश्वरांनी साेळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली; शंकराचार्यांनी साेळाव्या वर्षी भाग्य लिहिले- हा असामान्य प्रकार आहे. सामान्य माणूस साेळाव्या वर्षी गीता वाचेल, पण गीतेवर भाष्य अथवा टीका करणार नाही.गीता वाचू लागल्यानंतर लाेकमान्यांना त्यात खूप गाेडी वाटली व गीताग्रंथातील टीका व भाष्ये ते वाचू लागले. खूप अभ्यास केल्यानंतर त्यांना वाटू लागले कीआद्यशंकराचार्यांनी काढलेले गीतेचे तात्पर्य बराेबर नाही.
 
शंकराचार्यांच्या पूर्वी गीतेवर भाष्ये व टीका झाल्या हाेत्या. पण त्या आता उपलब्ध नाहीत. पूर्वीचे मत खाेडून काढण्याकरता आचार्यांनी गीतेवर भाष्य लिहिले.आचार्यांच्या भाष्यात जाे उल्लेख आहे त्यावरून पूर्वीच्या टीकाकारांनी व भाष्यकारांनी गीतेचा अर्थ ज्ञानकर्मसमुच्चयात्मक.म्हणजे ज्ञानी माणसाने देखील कर्म केले पाहिजे, असा प्रवृत्तीपर लावला हाेता व ताे सिद्धांत खाेडून काढण्याकरता आचार्यांनी आपलेभाष्य लिहिले.शंकराचार्यांचा काळ शके 710 ते 742 असा आहे.लाेकमान्यांना वाटू लागले कीज्ञान व कर्म ही उजेड व अंध:कार याप्रमाणे परस्पर विरुद्ध आहेत, असे प्रतिपादणाऱ्या शंकराचार्यांनीगीतेचा जाे निवृत्तिपर अर्थ लावला आहे, ताे बराेबर नाही.*** खूप अभ्यास केल्यानंतर गीता निवृत्तिपर नसून कर्मयाेगपर आहे. किंबहूना गीतेत ‘याेग’ हा एकेरी शब्द ‘कर्मयाेग’ या अर्थी याेजिलेला आहे.