आपण बऱ्याचवेळा डाेक्यावर बर्फाचा आणि जीभेवर साखरेचा खडा असावा असे म्हणत असताे. खरेच आहे, शांत डाेक्याने आणि गाेड जीभेने वागणारा माणूस काेणत्याही क्षेत्रात यशस्वी हाेताे. समाेरच्यांना आपलेसे करून घेण्याचा हा अत्यंत चांगला मार्ग असताे. मला चांगले आठवते, मला लहानपणी एका मित्राने दगड मारून जखमी केले हाेते. त्याचा बदला घेण्यासाठी मी दाेन मित्रांसह त्याच्या घराकडे गेलाे. त्याचे वडील बाहेर उभे हाेते. ते मला पाहून माझ्याजवळ आले.मला जवळ घेत व माझी जखम पाहत माझ्या डाेक्यापाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, अरे अरे माझ्या लेकराला खूप लागलं आहे. राजू, तुझ्या लहान भावाप्रमाणं आहे. तुला त्याचा राग आला असेल तर तू त्याला खूप बाेल आणि त्यावरही तुझा राग शांत हाेणार नसेल, तर माझ्यासमाेर तू राजूला मार.
त्यांच्या या गाेड वाक्याने माझ्या रागाला कुठेच पळवून लावले.त्यांच्या या गाेडव्याने माझ्या डाेळ्यांतून आनंदाचे आणि मीच जणू अपराधी असल्याचे अश्रू आणले हाेते. खराेखरच समाजात असे अनेक लाेक आहेत की ज्यांच्या नसानसात, शब्दा शब्दांत गाेडवाच गाेडवा असताे.आपणाला ज्ञानाेबा-तुकाेबांचा वारसा लाभल्याने आपणही गाेडव्यात कमी नसावे. आम्ही काढलेल्या अर्थातील उणिवा आपण पदरात घ्याव्यात. महाराजांची गाथा हा अनुभूतीचा विषय आहे. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448