ओशाे - गीता-दर्शन

    28-Jan-2023
Total Views |
 
 
 

Osho 
बिचारा कांट एक साधारण प्राध्यापक हाेता, त्याला कुलपतिपद मिळाले हाेते. अ‍ॅकॅडेमिक काैन्सिलची ती तार हाेती. नाेकर विसरून गेला, त्यानं विचार केला की भूकंप झाला तरी उठवायचं नाही अशी मनाई आहे; पण त्याने विचार केला की, ही इतकी खुशीची गाेष्ट आहे. इत्नया सुखाची वार्ता तर, आताच द्यायला पाहिजे.त्याने कांटच्या खाेलीत जाऊन त्याला हलवून उठवले अन् म्हटले, ‘अभिनंदन, विद्यापीठानं आपणास कुलपती नेमल्याची तार आताच आलीय.’ कांटने डाेळे उघडले, नाेकराच्या एक थाेबाडीत लगावली, आणि परत चादर पांघरून ताे झाेपी गेला. नाेकर तर खूपच चकित झाला, की हे काय? ‘भूकंपाच्या वेळी उठवायचं नाही अशी मनाई हाेती. पण ही गाेष्टच वेगळी हाेती...’ सकाळी उठताच कांटने पहिलं काम कुठलं केलं असेल तर हे की विद्यापीठाच्या ऑफिसला तार केली की,‘मला क्षमा करा. मी हे पद स्वीकारू शकत नाही.
 
कारण या पदामुळे माझ्या नाेकरालाही भ्रांती झाली; उद्या मलाही हाेईल. या पदाने माझी झाेपमाेड काल केली, आता आणखी पुढे तरी झाेपमाेड व्हायला नकाे. या पदामुळे कटकटी सुरू हाेतील अन् कटकटी सुरूही झाल्या आहेत... गेली कित्येक वर्षे मी दहा ते चार या वेळात कधीही उठलेलाे नाही...’ ताे सकाळी नाेकराला म्हणाला,‘तू एकदम वेडा आहेस.’ नाेकर म्हणाला, ‘पण तुम्ही तर सांगितलं हाेतं की भूकंप झाला तर उठवायचं नाही’ कांट म्हणाला, ‘दुःखाचेही भूकंप असतात... अन् जाे सुखाचे भूकंप स्वीकारताे त्याच्याच घरी दुःखाचे भूकंप येत असतात. एरवी दुःखाचे भूकंप व्हायचं काहीच कारण नाही. सुरुवात झालीच हाेती. जर मी खुश हाेऊन तुझे आभार मानले असते, तर मग मी खलासच झालाे असताे.