तैसें नवमीं कृष्णाचें बाेलणें। ते नवमींचियाचिऐसें मी म्हणें। या निवाडा तत्त्वज्ञु। जया गीतार्थु हातीं ।। 10.39

    28-Jan-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
या अध्यायात ज्ञानेश्वर प्रारंभीच आत्तापर्यंत झालेल्या विषयांची उजळणी करीत असून नवव्या अध्यायात आपण काय स्पष्ट केले आहे हे सांगत आहेत.नवव्या अध्यायातील श्रीकृष्णांनी केलेला उपदेश सद्गुरुनाथा, मी अजाण असलाे तरी माझ्याकडून अशक्य असणारा असा नवव्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही वदवून घेतलात. महाराज, पहिल्या अध्यायात आपल्या कृपेने मी गीतेच्या निरूपणास प्रारंभ केला. या अध्यायात अर्जुनाचा खेद वर्णन केल्यावर दुसऱ्यात निष्काम कर्मयाेग सांगितला. ज्ञानयाेग व बुद्धियाेग यांतील फरकही विशद केला. तिसऱ्या अध्यायात कर्मयाेग व चाैथ्यात ज्ञानयुक्त कर्मयाेग मी स्पष्ट केला. पाचव्या अध्यायात गूढ असे याेगतत्त्व सूचित करून सहाव्यात ते कुंडलिनीयाेगापर्यंत विस्तारून दाखविले. सातव्यात प्रकृतीचे रूप, भक्तांचे प्रकार, आठव्यात परमात्मा भक्ताचे रक्षण कसे करताे आणि प्रयाणसिद्धीची तयारी कशी करावी इत्यादि विषय स्पष्ट केले.
 
खरे पाहता गीतेच्या सातशे श्लाेकांमध्ये जाे अभिप्राय आहे, ‘ताे एकला नवमींच’ आहे. हा सर्व भावार्थ मी माझ्या बळावर सांगितला असे नाही. मी त्याचा गर्व कशाला वाहू? गूळ, साखर यांचे स्वाद वेगळे असतात ना? तसेच आमच्या संवादातील स्वाद निरनिराळे आहेत. असे असले तरी नवव्या अध्यायातील विषय समजावून सांगण्याच्या पलीकडचा आहे. तरी ताे गुरुकृपेने मी स्पष्ट केला.राम व रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगावयाचे झाल्यास रामरावणांसारखे लढले, असेच म्हणावे लागते.त्याप्रमाणे नवव्या अध्यायातील विषय हा नवव्यातील विषयासारखाच आहे हे श्राेत्यांना लक्षात येईल.