गीतेच्या गाभाऱ्यात

    28-Jan-2023
Total Views |
 
 
पत्र पहिले
 

Bhagvatgita 
 
श्रेयस्तत्रानृतं व्नतुं सत्यादिती विचारितम् । अशा वेळी सत्यापेक्षा असत्य बाेलणे श्रेयस्कर आहे, असे विचारांती ठरले आहे.सत्याची व्याख्या करताना महाभारतात म्हटले आहे, यद्भूतहितं अत्यंतं एतत्सत्यं मतं मम । ज्यामध्ये प्राणिमात्रांचे आत्यंतिक कल्याण आहे ते सत्य.एखादी गाेष्ट लाैकिक अर्थाने असत्य असेल, पण सूक्ष्म धार्मिक दृष्टीने ती असत्य ठरणार नाही.दराेडेखाेरांशी खाेटे बाेलणे किंवा गाईला मारायला आलेल्या कसायाशी खाेटे बाेलणे लाैकिक अर्थांने असत्य असेल, पण सूक्ष्म धार्मिक दृष्टीने विचार करता व वरील सत्याची व्याख्या पाहता ते असत्य ठरणार नाही.जे स्थूल दृष्टीने विचार करतात, ते धर्माच्या बाबतीत घाेटाळा करतात. जे सूक्ष्म दृष्टीने विचार करतात, त्यांना धर्माचा खरा अर्थ कळताे.सूक्ष्म दृष्टीच्या दुर्बिणीतून तू पाहा, म्हणजे तुला दिसेल की कृष्ण हा सत्याचा व अहिंसेचा पाठीराखा आहे.
 
श्रीकृष्णाची सूक्ष्म धार्मिक दृष्टी पांडवांना साहाय्य करण्यास धावली नसती, तर सत्याच्या स्थूल कल्पनेच्या खाेड्यातून त्यांची सुटका झाली नसती.महाभारतातल्या दाेन गाेष्टी तू विचारात घे.काैरव-पांडव युद्धात कर्णाने युधिष्ठिराचा पराभव केल्यानंतर युधिष्ठिरास राग आला व ताे अर्जुनास म्हणाला- ‘‘करावयाचे काय तुझे गांडीव धनुष्य. देऊन टाक ते दुसऱ्याला!’’ अर्जुनाची अशी प्रतिज्ञा हाेती की जाे काेणी गांडीव धनुष्याला नावे ठेवील त्याला ठार मारावे.युधिष्ठिराने धनुष्याला नावे ठेवल्यावर लगेच अर्जुन युधिष्ठिरास ठार मारण्यास उद्यु्नत झाला.कृष्ण म्हणाला- ‘‘ अरे ! काय हा वेडेपणा!’’ अर्जुन म्हणाला- ‘‘मी सत्यप्रतिज्ञ आहे. काही झालं तरी माझी प्रतिज्ञा मला पुरी केली पाहिजे. मी आता युधिष्ठिरास ठार मारणार!’’ लाैकिकदृष्ट्या सत्याचे पालन करून अर्जुनाने सारा घाेटाळा केला असता.
 
ज्यांना धर्माचा बारकावा कळत नाही व जे सत्याच्या भाेंगळ कल्पनांना चिकटून बसतात ते जीवनात घाेटाळा करतात.कृष्ण म्हणाला- ‘‘अर्जुना ! तुला धर्माचा बारकावा कळत नाही. अशी प्रतिज्ञा करणे हा मूर्खपणा आहे व अशा तऱ्हेने सत्यप्रतिज्ञ हाेणे म्हणजे अधर्माचा कळस आहे. अशा वेळी तू सत्याचा सूक्ष्म अर्थ विचारात घे. धर्माचा बारकावा सांगताे कीजे सज्जन व माेठे आहेत त्यांची निर्भर्त्सना करणे म्हणजे त्यांचा वध करण्याप्रमाणे आहे.’’ कृष्णाचा उपदेश ऐकून अर्जुनाने युधिष्ठिराची निर्भर्त्सना केली व अशा तऱ्हेने त्याने आपली प्रतिज्ञा पुरी केली.नंतर अर्जुन म्हणाला- ‘‘युधिष्ठिराचा जाे वध करील त्याला ठार मारणे अशी माझी दुसरी प्रतिज्ञा आहे. पर्यायाने का हाेईना मी युधिष्ठिराचा वध केला आहे. मी सत्यप्रतिज्ञ असल्यामुळे आता मी स्वत:चाच वध करताे.’’