त्यांना असं वाटतं की, समज नाहीये, तर ताकदीनं निभावून नेऊ आपण पण असं कधी ताकदीनं निभावून नेता येत नसतं.राईएवढी समज डाेंगराएवढ्या ताकदीहून जास्त ताकदवान असते. तिचं काम ताकदीनं कधीच पुरं हाेणार नाही. ‘समज’च विकसित करावी लागेल. जेव्हा सुख येईल तेव्हा न्याहाळून पाहा, ते भाेगा आणि हे समजून घ्या की राेजच्या राेज सुख कसं दु:खात बदलत असतं.शेवटपर्यंत यात्रा करा आणि पहा की ती यात्रा सुखापासून सुरू झाली आणि दु:खाला येऊन पाेहाेचली. अशा पाच पन्नास सुखाच्या यात्रा करून टाका. समजत राहत, जागं राहत, बदलाचा अनुभव घेत मग आपल्यात परिप्नवता येते.आपल्याला समजून चुकतं की इथं ताकदीचं काम नाहीये.
बस्स् इकडून सुख येतं आणि आपणाला समजून जातं की हे पहा दु:ख आलं.. आपण ज्या दिवशी इत्नया सरळपणे रहाल त्या दिवशी निष्कंप चित्त निर्माण हाेईल, ताकदीनं असं निष्कंप चित्त निर्माण हाेणार नाही.बरेच दुराग्रही लाेक ताकदीनं धर्म हिरावू पाहतात. पण ते कधी धर्माला प्राप्त हाेणेच श्नय नाही, ते केवळ अहंकाराला उपलब्ध हाेतात.ताकदीमुळे अहंकार मिळू शकताे.समजेमुळे अहंकार गळू शकताे.ताकद लावून जर आपण म्हणालात की, ठीक आता आम्ही सुखाला सुख मानीत नाही, अन् दु:खाला दु:ख मानीत नाही. आता आम्ही डाेळे बंद करून ताकदीच्या जाेरावर सगळं निभावून नेऊ. पण अशानं फ्नत अहंकार मजबूत हाेईल.दुसरं काही एक हाेणार नाही. हा अहंकार आपल्या पद्धतीचं सुख देऊ लागेल आणि आपल्या पद्धतीचं दु:ख आणू लागेल... एक खेळ सुरू हाेईल.समज वाढवा, अंडरस्टॅँडींगवर लक्ष ठेवा. जेवढी समज वाढेल, जेवढी प्रज्ञा वाढेल. तितके आपण निष्कंप व्हाल.