सद्गुरुंनी आपल्यावर कृपाप्रसाद कसा करावा हे सांगण्यासाठी काही प्राचीन उदाहरणे दिली आहेत. उपमन्यू हा वसिष्ठकुलातील व्याघ्रपादाचा मुलगा. हा एकदा लहानपणी मुनींच्या आश्रमात खेळत असताना त्याने गाईचे दूध काढताना पाहिले. या दुधाचे गुण त्याला माहीत हाेते.घरी येऊन त्याने आईला दूध मागितले. आईने पाण्यात पीठ कालवून ते त्याला दिले. पण उपमन्यूला ते मान्य झाले नाही. आईच्या सांगण्यावरून त्याने शंकरांची उपासना केली. शंकरांनी त्याला प्रसन्न हाेऊन दुधाचा सागरच प्राप्त करून दिला. अथवा रुष्ट झालेल्या धु्रवासाठी वैकुंठपती नारायणांनी त्याला अढळ असे पद दिले. यांच्याप्रमाणे सद्गुरुंनी आपणांवर कृपा करावी.मागील ओवीत सुरू झालेले सद्गुरूंचे स्तवन याहीपुढे चालूच राहिले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की, सद्गुरुनाथा, तू संसाररूपी हत्तीचे गंडस्थळ ाेडणारा आहेस.
या जगाचे आदिस्थान तू आहेस. तुझा प्रसाद मिळाल्यानंतर मूढ बालकही वाययाची निर्मिती करू शकते. महाराज, आपण मुक्याला जरी गाेंजारले तरी ताे बृहस्पतींशी स्पर्धा करताे. ज्या जीवाच्या मस्तकावर आपण हात ठेवाल त्याला शिवरूप प्राप्त हाेईल. आणखी तुमचे किती वर्णन करू? कल्पवृक्षाला शृंगार कसा करावा? कापराला काेणता वास द्यावा? चंदनाला काेणती उटी लावावी?त्याचप्रमाणे सद्गुरुंचे नमन कसे करावे? म्हणून मी ार न बाेलता माैनाचेच नमन करताे.सद्गुरुनाथा, प्राचीन काळी उपमन्यूवर वा ध्रुवावर आपण जशी कृपा केली तशी माझ्यावर करावी. माझ्याकडे ममतेने पहावे. गंगायमुनांच्या संगमात जसा प्रयागतट, तसा मी कृष्णार्जुनांच्या संवादात आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात.