गीतेच्या गाभाऱ्यात

    25-Jan-2023
Total Views |
 
 
पत्र छत्तिसावे
 

Bhagavatgita 
 
अगं, लग्नापूर्वी आपली पत्रिका पाहिली हाेती. त्यावेळी छत्तीस गुण जुळले हाेते. आता या छत्तीस पत्रामुळे ती छत्तीसगुणी पत्रिका सार्थ हाेवाे व तुला सुखशांती समाधान लाभाे.लग्नानंतर नवराबायकाे मधुचंद्राला जातात. त्यावेळी शृंगार हा रसाचा राजा असताे.पुढे पुढे माणसाला समजून व उमजून येते की शृंगाररसापेक्षा एक श्रेष्ठ रस आहे. त्याचे नाव शांत रस. हाच रस रसाचा राजा असताे.याच शांतरसात आपण उभयता पाेहत आहाे व आपल्याला अनुभव येत आहे की - शृंगाररसातील मधुचंद्रापेक्षा शांतरसातील मधुचंद्र जास्त सरस नि सुरस आहे.लग्नाच्या वेळी सप्तपदी झाल्यानंतर मंत्र म्हटला - सखा सप्तपदी भव.आता परमार्थांच्या प्रांतात प्रवास करत असताना व शांतरसात पाेहत असताना- मी सखा व तू सखी असे म्हणणारातुझाच राम इति शम् श्रीकृष्णार्पणमस्तु