तुका म्हणे थाेडे । आयुष्य अवघेचि काेडे ।।2।।

    24-Jan-2023
Total Views |
 
 

saint 
 
नाशवंत अशा कसल्याही धन संपत्तीची व भाैतिक सुखाची अपेक्षा न करणाऱ्या तुकाराम महाराजांनी जर भरपूर करायचे शिल्लक राहत आहे आणि आयुष्य संपण्याच्या मार्गावर आले असे म्हटले आहे, तर सामान्य जीवाच्या बाबतीत हे किती अवघड आहे.संसारात अडकलेला जीव चांगल्या गाेष्टी सहजासहजी करीत नाही. चांगले करण्याच्या कल्पना मात्र भरपूर करताे. पंढरीची वारी, व्रत, नियम, मीपणातून मुक्ती या बाबी अनेकांच्या मनालाही शिवत नाहीत. आयुष्य भरपूर आहे, केव्हाही या बाबी करता येतील. आज तनामनाच्या इच्छांची पूर्ती केली पाहिजे, असे अनेकांना वाटते.भजन, कीर्तन, परमार्थ या गाेष्टी वृद्धपणी करायच्या असतात. तारुण्यात यापैकी काही करण्याची गरज नाही.
 
अशी स्वार्थी मनाेवृत्ती अनेकजण जाेपासतात.खरे म्हणजे प्रत्येकाला वृद्धपण लाभेलच असे नाही. कारण पुढचा क्षण आपल्या मालकीचा आहे, असे काेणालाही सांगता येत नाही. हे जर खरे नसते, तर अनेकांचा बालपणी, तरुणपणी मृत्यू झालाच नसता. थाेडक्यात पुढचा क्षण आपल्या ताब्यात नसल्याने प्रत्येकक्षणी आपल्याकडून चांगलेच घडेल याची काळजी ज्याने त्याने घेणे याेग्य असते. निघून गेलेली वेळ परत येत नसते. त्यामुळे प्रत्येक क्षणाची काळजी घेणे याेग्य असते. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448