ओशाे - गीता-दर्शन

    24-Jan-2023
Total Views |
 
 
 

Osho 
ताे फ्नत अंधारातून जाण्याबद्दलच म्हणताेय की मी न भिता अंधारातून जाताे! जर आपण ताकद लावली, तर मग समजा की आपण बहादुर अंधारात कंप पावला आहात. ते हात आवळणं कंपनच आहे, छे, छे, हात आवळण्याची काहीच गरज नाहीये. ही गाेष्ट, तिसरं सूत्र नीट लक्षात घ्या.नाही लक्षात घेतलं, तर साधकाची माेठी पंचाईत हाेते.जर ताकद लावून आपण असं म्हणालात, ‘ठीक आहे, येऊ द्या सुख, घालू द्या माळ कुणी माझ्या गळ्यात, मी बराेबर डाेळे बंद करताे, श्वास राेखताे आणि छाती आकसून घेताे. बिलकूल निष्कंप हाेऊन जाताे.’ तर मग आपण आधीच कंप पावलेले आहात! अगदी कंप पावला आहात. बाजारात पन्नास पैशाला मिळणाऱ्या माळेसाठी एवढी ताकद लावायची, याचा अर्थ असा की, कंपन तर खूप झाले.
 
आपण तर आधीच खूप विचलित झालेले आहात. किती वेळ छाती आकसून धराल? किती वेळ डाेळे बंद ठेवाल? डाेळे पुन: उघडावे लागतील.आकसलेली छाती पुन्हा ढिली साेडावी लागेल. मग जी भीती दाबून ठेवली हाेती ती थाेड्या वेळात पुन्हा उफाळून वरआलीच म्हणून समजा.नाही, समज यायला पाहिजे. श्नतीची गरज नाही, तर समज येण्याची गरज आहे. जेव्हा सुख येईल तेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न करा. असे ताकद लावून शत्रू बनून उभे ठाकू नका. कारण जेव्हा तुम्ही शत्रू बनून असे उभे ठाकता तेव्हा त्याची ताकद मान्य करता. अशी ताकद लावू नका, समजून घ्या. एक गाेष्ट लक्षात ठेवा की, जेवढी समज कमी, तेवढी जास्त श्नती लाेक लावत राहतात.