क्राेध, राग हा मनुष्याचा शत्रू आहे.क्राेध एकदा का डाेक्यात शिरला की, ताे दिवाळं काढल्याशिवाय थांबत नाही. जिथं राग आहे, तिथं दिवाळी कशी असेल? दिवाळंच असते की प्रत्येक रागीट व्यक्तीला रागामुळे हाेणारे नुकसान हे साेसावेच लागते म्हणून आठवड्यातला एखादा दिवस वगळता रागावू नका. कधी रागावण्याने समाेरच्यावरही प्रभाव पडताे. दिवसभरात दहावेळा रागवाल, तर समाेरचा म्हणेल, ‘‘यांना तर ओरडण्याची सवयच झालीये’’. स्वत:वर रागवायला शिका.