नाहीं अधिकार । कांहीं घाेकाया अक्षर ।।2।।

    21-Jan-2023
Total Views |
 
 

Saint 
 
धर्मशास्त्र, वेद, गीता, गाथा अशा पवित्र ग्रंथांच्या वाचनाचा अधिकार सर्वांनाच आहे, असे म्हणणारे तुकाराम महाराज वाचकाकडून केवळ पवित्र वर्तनाची, विचारांची, भावनेची अपेक्षा करीत आहेत. मनाची पवित्रता, एकाग्रता, स्थिरत्व नसेल, त्याचबराेबर या ग्रंथाकडे पाहण्याचा दृष्टिकाेन सकारात्मक नसेल तर या ग्रंथातूनही अशा व्य्नतीला काही मिळणार नाही.आपल्यात पावित्र्य व सकारात्मक दृष्टीची वाढ व्हावी, आपण ईर्षा, द्वेष, मत्सर, आदीतून मुक्त व्हावे एवढ्याच दृष्टिकाेनातून महाराजांनी येथे अधिकाराची भाषा वापरली आहे. स्त्री, पुरुष, लहान थाेर असा कसलाही भेद महाराजांनी केला नाही. मनाच्या प्रसन्नतेशिवाय आणि एकाग्रतेशिवाय केलेले कार्य खराेखरच चांगली फलनिष्पत्ती देत नाही.
 
म्हणून मानवतेचे सर्वांगीण दर्शन ज्या ग्रंथातून हाेते अशा ग्रंथांना वाचतांना मनाची एकाग्रता, भावनेची पवित्रता असणे आवश्यक आहे. ज्ञानाेबा-तुकाेबांच्या भक्तांना या गाेष्टी वेगळ्याने सांगण्याची गरज असेल असे मला वाटत नाही. महाराजांच्या अभंगांचा अर्थ आम्ही आमच्या अल्प बुद्धीला सुचेल तसा काढला असल्याने मूळ अर्थासाठी गाथा वाचणे आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा गाथा वाचत गेल्यास खूप छान अर्थ आपणाला जाणवू शकतील. मुळात गाथा ही अनुभूतीचा विषय आहे. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448