ओशाे - गीता-दर्शन

    21-Jan-2023
Total Views |
 
 
 

Osho 
कधी कधी जरा हिशेब करीत चला, की आपल्याला काेणकाेणत्या क्षुद्र गाेष्टी कशा कशा पळवतात! रस्त्यानं जाताना दाेन माणसं जाेरानं हसतात आणि आपलं कंपन व्हायला तेवढं पुरेसं असतं.माझे एक मित्र आहेत, त्यांना संन्यास घ्यायचा आहे, ते मला राेज म्हणतात, ‘संन्यास घेणार आहे, पण मी तर या कपड्यातच संन्यासी आहे.’ अनेक जण येथे येऊन मला हेच म्हणतात. ‘आम्हाला काय उणीव आहे? आम्ही तर या कपड्यातच संन्यासी आहाेत.’ मग मी म्हणताे, ‘असं जर आहे तर मग कसली भीती? घाला ना भगवे कपडे.’ मग मात्र चरकतात.माेठा सश्नत संन्यासी दिसताे, घातले भगवे कपडे की लागला कंपित व्हायला. कंपन कसलं? तर, दुसऱ्यांच्या डाेळ्याचं. लाेकांनी पाहिलं तर काय म्हणतील? ऑफिसात गेलाे आणि चपराशी खीं खीं करून आपल्याला हसला, तर आपलं कसं व्हायचं?
 
काेण काय म्हणेल, ही गाेष्ट आपणास इतकं विचलित करते. इत्नया दुबळ्या चित्तात फारशा माेठ्या घटना घडू शकत नाहीत.भगवे कपडे घालणे ही फारशी माेठी घटना नाही. पण, भगवे कपडे घातल्याने एक गाेष्ट प्नकी हाेते की, आता काेण काय म्हणेल याची काळजी साेडा. ही मात्र जरूर माेठी घटना आहे. भगव्या कपड्यात काही विशेष ठेवलेलं नाही, पण या घटनेत जरूर बरंच काही आहे.लाेक काय म्हणतील? लाेकांच्या शब्दांनी किती कंप हाेताे? हे शब्द म्हणजे काय? ताेंडातून येणारे हवेचे बुडबुडे. एक जण ताेंड हलवताे, हवेत एक आवाज निर्माण करताे, त्याची आपल्या कानाशी ट्नकर हाेते-बस्स, आपण कंप पावलात! आत्मा एवढा कमजाेर?