चाणक्यनीती

    21-Jan-2023
Total Views |

Chanakya
2. कुळाचा उद्धार : चांगली कर्मे करणारी व्यक्ती नेहमीच कुळाचा उद्धार करते. साध्वीसाधूंसाेबत गाववेशीपर्यंत जाणाऱ्या धार्मिक व्यक्ती आपण पाहताे. निराेप देऊन त्या व्यक्ती पुन्हा संसारजालात फसतात. त्याही जर ‘साधू’ व्यक्तीसाेबत गेल्या, तर त्यांच्या सत्कृत्याने त्यांचे संपूर्ण कुळच सदाचरणी बनते.त्यांची आत्माेन्नती हाेते. याचाच अर्थ संसारी व्यक्तींनी देखील विरक्त व्हावे असे नव्हे; परंतु सदाेदित सत्संग मात्र ठेवावा, धर्माचरण करावे.कमलपत्राप्रमाणे निर्लेप राहून धर्माचरण करावे.
बाेध : ‘सत्संगती सदा घडाे, सुजन वाक्य कानी पडाे.’