चाणक्यनीती

    20-Jan-2023
Total Views |
 
 

Chanakya
 
वाच्यार्थ: साधूसमान जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्ती पुत्र, मित्र, नातेवाईक या सर्वांना साेडून जातात; परंतु अशा व्यक्तीसाेबत जे जातात तेही आपल्या कुळाचा उद्धार करतात.
 
भावार्थ : येथे चाणक्यांनी साधुमहिमा सांगितला आहे.
1. साधू : सज्जन, अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारी व्यक्ती सामान्य लाेकांपेक्षा वेगळे असे जीवन जगते. साहजिकच अशी व्यक्ती एका जागी राहत नाही. ठिकठिकाणी जाऊन सदाचाराचा, धर्माचा उपदेश करते. अशा व्यक्तीपासून पुत्र (कुटुंब), मित्र आणि नातेवाईक दुरावतात.