गीतेच्या गाभाऱ्यात

    20-Jan-2023
Total Views |
 
 
पत्र छत्तिसावे
 
 
Bhagvatgita
 
हा भ्नितयाेग ऐकून दहाव्या अध्यायात अर्जुन वेगळे बाेलू लागला. आत्तापर्यंत ताे नाना तऱ्हेच्या शंका विचारत हाेता.तू सांगताेस ते बराेबर आहे असे ताे म्हणत नव्हता, पण या अध्यायाच्या चाैदाव्या श्लाेकात ताे प्रथम म्हणताेतू सांगताेस ते सारे मला खरे वाटते आहे.
तू आणखी असे लक्षात घे कीआजपर्यंत अर्जुन कृष्णाला अरिसूदन, केशव, जनार्दन, वार्ष्णेय, कृष्ण मधुसूदन, पुरुषाेत्तम, असे गीतेतम्हणत आहे, पण दहाव्या अध्यायाच्या चाैदाव्या श्लाेकात कृष्णाला ताे प्रथम ‘‘भगवान्.’’ असे म्हणाला.गीतेत ‘‘अर्जुन उवाच’’ ‘‘भगवानुवाच’’ प्रथमपासून आहे, पण अर्जुन कृष्णाला ‘भगवान’ म्हणाला ते प्रथम दहाव्या अध्यायाच्या चाैदाव्या श्लाेकात.ज्ञानयाेग सांगून झाला. कर्मयाेग सांगून झाला पण त्यायाेगे जाे परिणाम झाला नाही ताे भ्नितयाेगाने झाला. अर्जुन रंगून गेला. कृष्ण बाेलताे ते सारे खरे असे त्याला वाटू लागले.कृष्णाला ताे ‘भगवान’ म्हणाला आणि मग कृष्णाच्या विभूति जाणण्याची त्याने इच्छा प्रदर्शित केली.सर्वांच्या अंतर्यामी वसणाऱ्या आत्म्यापासून ज्ञानी लाेकांच्या ज्ञानापर्यंत कृष्णाने मुख्य विभूति सांगितल्या व म्हटले की- ‘सर्व भूतांचे जे बीज आहे ते मीच आहे.’
 
11) विश्वरूपदर्शन याेग.या अध्यायात विश्वरूपदर्शन आहे. अर्जुनाच्या माेहाचे निरसन हे प्रधान कार्य आहे.तू असे लक्षात घे कीज्ञानयाेग सांगून अर्जुनाचा माेह गेला नाही, कर्मयाेग सांगून त्याचा माेह गेला नाही तर भ्नितयाेग सांगून झाल्यावर साऱ्या विश्वात परमेश्वर भरला आहे हे समजल्यावर अर्जुनाचा माेह गेला आणि म्हणूनच अकराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लाेकात ताे म्हणताे, माेहाेऽयं विगताे मम।- माझा माेह नाहीसा झाला.आता कृष्णाला ‘परमेश्वर’ या नावाने संबाेधताे व अशी इच्छा प्रदर्शित करताे की परमेश्वराने आपले ‘ऐश्वर रूप’ दाखवावे.कृष्णाने या अध्यायात नितांत माेलाचा विचार सांगितला आहे.वेदानी, तपाने, दानाने किंवा यज्ञाने मनुष्य देवाला पाहू शकत नाही. देवाला पाहण्याचे साधन जर काेणते असेल तर ते म्हणजे अनन्यभ्नती.
 
तुला एक महान गुह्य सांगताे. तू रात्री निजताना जास्तीत जास्त भ्नतीने म्हण- ‘‘देवा, निदान स्वप्नात तरी तू ये व माझ्याशी बाेल’’ तुझी जर अनन्यभ्नती असेल तर कृष्ण तुझ्या स्वप्नात येईल, तुझ्याशी बाेलेल, व तुला वाटेल की ताे आनंद मेयर हाेण्यापेक्षा अथवा मिनिस्टर हाेण्यापेक्षा फार फार थाेर आहे.या अध्यायाचा शेवटचा पंचावन्नावा श्लाेक भ्नितपर आहे आणि गंमत अशी की, यात कर्म शब्द असून देखील कर्माच्या विरुद्ध व ज्ञानाच्या बाजूने बाेलणारे शंकराचार्य आपल्या भाष्यात बाेलून गेले की हा श्लाेक म्हणजे साऱ्या गीताशास्त्राचे सार आहे.(12) भ्नितयाेग.यात भ्नितयाेग आहे. या लहान व महान अध्यायात भगवान कृष्ण सांगतात की- सगुण उपासकापेक्षा निर्गुण उपासकाला फार फार ्नलेश हाेतात.