ऐसें हे अवघेचि ऐकावे। परंतु सार शाेधून घ्यावे ।।2।।

    02-Jan-2023
Total Views |
 

Saint 
 
श्रवणाद्वारे करून घेण्याच्या ज्ञानाचे विविध मार्ग सांगितल्यानंतर श्रीसमर्थ आता श्रवणभ्नतीच्या गाभ्याकडे वळतात आणि सांगतात की भ्नतीचे नऊ मार्ग, मु्नतीचे चारीही प्रकार आणि त्याची साधना करीत आत्मज्ञान करून उत्तम गती कशी मिळवावी याचे ज्ञान साधकाने श्रवणश्नतीने प्राप्त करावे.अशा रीतीने सगुण वस्तूंचे आणि भगवंताच्या सगुण अवतारातील लीलांचे ज्ञान श्रवणभ्नतीने प्राप्त करून घ्यावे आणि नंतर त्यामधून निराकार व निर्गुण स्वरूपात भगवंताचे, शाश्वत व अशाश्वत यामधील फरकाचे आणि जीव-शिवाच्या अभेद्य आणि अद्वैत अशा एकरूपतेच्या आत्मज्ञानास पाेचावे. भगवंतापासून कधीही विभ्नत न राहणाऱ्या भ्नतांच्या भ्नितभावातील अनन्यतेचे मूळ शाेधण्याचा श्रद्धायु्नत प्रयत्न करून ते साध्य करून घ्यावे. या समासाचा उपसंहार करताना श्रीसमर्थ एक महत्त्वाचे सूत्र सांगतात.
 
अनेकदा विद्वान माणसे खूप ज्ञान मिळवून सर्वज्ञ हाेण्याच्या पाठीमागे लागतात. ्नवचित ते सर्वज्ञ बनतातही. परंतु त्या ज्ञानातील काय घ्यावयाचे व काय साेडायचे या मूलमंत्रालाच पारखे हाेऊन ते शेवटी जन्म वायाच घालवतात. असे हाेऊ नये म्हणून श्रवणभ्नती म्हणजे हे सर्व ज्ञान ऐकून प्राप्त करून घ्यावे. परंतु त्यातील सार शाेधून तेवढेच घ्यावे आणि बाकी जे जे अंतिम माेक्षप्राप्तीच्या उद्दिष्टासाठी असार आहे ते सर्व साेडून द्यावे असे बजावून श्रीसमर्थ नीरक्षीर विवेकाचा महत्त्वाचा मार्ग अनुसरण्यास सांगत आहेत! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299