रात्रही येईल अन् सकाळही येईल. या पृथ्वीवर आपण ज्ञानाला उपलब्ध झालात, तर त्यामुळे रात्र उजळली जाणार नाही, दु:खाचे सुख नाही हाेणार.आपण ज्ञानाला उपलब्ध झालात तरी काटा पायाला बाेचेलच. ताे फुलासारखा वाटणार नाही, काट्यासारखाच वाटेल. मग फरक कशात असेल? आतील चेतना डळमळते केव्हा? पायात काटा घुसताे तेव्हा? नाही, जेव्हा आतील चेतना असे मानते की, काटा मला बाेचला, तेव्हा.जर आतील चेतना काट्याच्या बाेचण्याच्या पार राहील तर ती अनुद्विग्न राहील. अशी चेतना अस्पर्शित, अनटच्ड् बाहेरच राहते.असे बाहेर राहण्याची कला म्हणजेच याेग आहे. या बाहेर राहण्याच्या कलेबद्दलच कृष्ण सांगत आहे. अशा स्थिर झालेल्या चेतनेतच, वाऱ्याच्या झाेतांनी जिच्यात काहीही कंप हाेत नाही अशा ज्याेतीसारख्या चेतनेतच अस्तित्वाची परमसत्ता विराजमान हाेते. ती तिथे विराजमान आहेच.
पण अशा ज्याेतिर्मय हाेण्यानं फ्नत त्या सत्तेच्या मंदिराचे दरवाजे उघडतात. त्या आधी आपल्याला याचा पत्ताही लागत नाही.चेतनेला दाेनपैकी एकाच अवस्थेचा पत्ता लागताे-एक तर ती तादात्म्याच्या जगात संयु्नत हाेऊन राहिली तर तिला जगाचा पत्ता लागत राहताे. किंवा जर ती तादात्म्याच्या जगातून बाजूला झाली, तटस्थ हाेऊन गेली तर तिला परमात्म्याचा पत्ता लागू शकताे.आपण मध्ये उभे आहाेत असे समजा.एकीकडे संसार अन् एकीकडे परमात्मा.आपली नजर जाेवर संसाराकडे लागून राहिलेली असते ताेवरदुसरीकडच्या परमात्म्याकडे नजर टाकण्यास वेळच मिळत नाही. जेव्हा संसारापासून नजर थाेडीशी ढिली हाेते, अलग हाेते, तेव्हा आपाेआपच ती परमात्म्याकडे जाऊ लागते.कुठे का हाेईना, नजर पडत राहणारच.काही ना काही पाहणे हा नजरेचा धर्मच आहे.ती दाेन बाजूंनी जाऊ शकते. पदार्थाकडे किंवा परमात्म्याकडे.