गीतेच्या गाभाऱ्यात

    02-Jan-2023
Total Views |
 
 

Bhagvatgita 
 
पत्र तेहतिसावे करुणाकष्टके, साेळा लघु काव्ये, रामायण, स्फुट कविता, स्फुट ओव्या, श्लाेकबद्ध स्फुटे, मनाचे श्लाेक, भारूडे, स्ताेत्रे, आरत्या, रामवरदायिनी, आनंदवनभुवन, दासबाेध - अशा तऱ्हेचे समर्थांनी प्रचंड वाङ्मय लिहिले. टाकळीस पुरश्चरण करून साक्षात्कार झाल्यापासून निर्वाणापर्यंत म्हणजे शके 1574 पासून शके 1603 माघ पर्यंत सुमारे पन्नास वर्षे समर्थांचे लिहिणे चालू हाेते.
शके 1603 माघ वद्य नवमीला समर्थांचे निर्वाण झाले.‘‘यत्न ताेचि देव जाणावा’’ हा महामंत्र समाजास देऊन जन्मभर समर्थांनी महाराष्ट्राच्या कल्याणाकरता, जीवाचे रान केले. ‘भारते सारं उद्याेगपर्वम्।’ असे म्हटले जाते.
 
कृष्णाने आपल्या जीवनात यत्नावर फार माेठा भर देऊन राजकारण व धर्मकारण यांचा समन्वय केला. समर्थांनी देखील यत्नावर फार माेठा जाेर देऊन राजकारण व धर्मकारण ह्यांचा समन्वय केला.कृष्णाने प्रपंच व परमार्थ ह्यांचा समन्वय आपल्या जीवनात केला. समर्थांनी तीच समन्वयाची शिकवण समाजाला दिली.कृष्णाने गीतेत जे तत्त्वज्ञान सांगितले आहे ते समर्थ जगले.गीता वाचावी कशी, यापेक्षा गीता जगावी कशी, या गाेष्टीला विशेष महत्त्व आहे. समर्थांनी नुसतीच गीता वाचली नाही, तर ते गीता जगले. म्हणूनच मला वाटते आपण त्यांनाकाेटी काेटी प्रणाम करूया.
 
*** तुला आणखी एक महत्त्वाचा विचार सांगू? वयाच्या पंधराव्या वर्षापासून आजतागायत चार तपे म्हणजे अठ्ठेचाळीस वर्षे मी गीता वाचताे आहे व त्यातील तत्त्वज्ञानाचा जीवनात प्रयाेग करताे आहे. ज्ञान की कर्म म्हणून विद्वान खुशाल वाद कराेत पण माझी खात्री झाली आहे की गीतेत कृष्णाने ज्ञान, कर्म व भ्नती यांचा समन्वय केला आहे व हा समन्वय करताना त्याने भ्नतीवर फार जाेर दिला आहे.अग, भ्नतीवर जाेर दिल्याशिवाय अंतरंगातील देवाची ओळख हाेत नाही.कृष्णाने गीतेचा उपसंहार करताना जाेर दिला आहे ताे भ्नतीवर. प्रवचन संपल्यावर वारकरी मला म्हणाले-‘साहेब, तुमचे प्रवचन ऐकून आम्ही फार खूश झालाे.
 
आम्ही आमच्या पठडीत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम ह्यांचे नाव घेताे, पण समर्थांचे कधी नाव घेत नाही.’ मी म्हटले ‘का?’ वारकरी म्हणाले- ‘ते आमचे गुपित आहे, पण तुम्हाला म्हणून सांगताे. बाकीच्या संतांनी भ्नतीवर जाेर दिला आहे, पण समर्थांनी भ्नतीवर जाेर दिला नाही म्हणून आम्ही त्यांचे नाव घेत नाही.’हा मुद्दा हाेता, गुद्दा नव्हता. मी म्हटले- ‘अहाे मनाचे श्लाेक पहा.’ समर्थ म्हणतात- मना सज्जना भ्नितपंथेचि जावे। तरी श्रीहरी पाविजेताे स्वभावे ।। संयु्नत महाराष्ट्र झालाच पाहिजे असे म्हणून चवर जाेर देण्यात येताे त्याप्रमाणे समर्थांनी ‘भ्नितपंथे पुढे चि म्हणजे च घालून फार जाेर दिला आहे.’ ते वारकरी कदाचित माझे बारसे जेवले असतील. ते म्हणाले- ‘अहाे, मनाचे श्लाेक लहान मुलांच्याकरता व बायाबापड्यांच्या करता आहेत.