ऐसी पूजा न घडे बरवी। तरी मानसपूजा करावी ।।1।।

    19-Jan-2023
Total Views |
 
 

saint 
 
भक्तांना प्रत्यक्ष सगुण पूजेची माहिती व्हावी यासाठी श्रीसमर्थ म्हणतात की, पंचामृत, गंध, ूल, अक्षता, सुगंधी द्रव्ये, धूप, दीप, कापूर, निरांजने, अलंकार, खाद्यनैवेद्य अशा ज्या ज्या वस्तू आपणास प्रिय असतील आणि शक्य असतील त्या उपकरणांसहित ही पूजा करावी. वेगवेगळी पवित्र तीर्थक्षेत्रे असतात. त्या त्या क्षेत्राचा जाे पूज्य देव असताे त्याची त्या क्षेत्री जाऊन षाेड्शाेपचारे पूजा करावी. तसेच आपापल्या शक्तीनुसार त्या त्या तीर्थक्षेत्री येणाऱ्या भक्तांच्या साेयीसाठी तलाव, विहिरी, धर्मशाळा, ओवऱ्या आदी बांधाव्यात. तसेच मंदिरातील उत्सवांसाठी पालख्या, सिंहासने, मेघडंबऱ्या अर्पण कराव्यात. देवळांची डागडुजी करावी, शिखरांचे काम करावे, तसेच छते, मंडप, पडदे, सुशाेभितदृष्ट्या झुंबरे-हंड्या द्यावीत.
 
इतकेच नव्हे तर हत्ती, घाेडे, रथसुद्धा दान करावेतया सर्व अर्पण करण्यामागे स्वत:चे नाव व्हावे असा हेतू नसावा, तर ते दान निरपेक्ष भक्तिभावाने असावे. येणाऱ्या यात्रेकरूंना प्रसन्न वाटावे म्हणून पाेपट, माेर, काेकिळ, हरणे, सांबरे हीसुद्धा देवस्थानास भेट द्यावीत आणि तेथील देवकार्यास उपयाेगी पडावीत म्हणून गायी-म्हशी अशी दुभती जनावरे आणि वाहतुकीसाठी म्हणून बैलजाेड्याही द्याव्यात. अर्थात हे सर्व केले म्हणजेच अर्चनभक्ती किंवा देवाची खरी पूजा हाेते असे नाही. कारण प्रत्येकाचीच असे देण्याची आर्थिक स्थिती कशी असणार? त्यामुळे ज्याला जी जी अगदी अल्पस्वल्प गाेष्टसुद्धा शक्य असेल ती भक्तिभावाने दिली तरी चालते. या अर्पणामागे ‘‘स्व’’ देण्याचा भाव हवा हे महत्त्वाचे. माेठी देणगी देणाऱ्याची भक्ती श्रेष्ठ असे आजकाल भल्याभल्या तीर्थक्षेत्रातील संस्थानिक मंडळी समजतात. खरे म्हणजे त्यांना संतांच्या गादीवर बसूनही संतांचे मर्मच कळले नाही, असे म्हणावे लागते.