4. विद्या : मूल आपल्या नैसर्गिक कलानुसारच विद्या ग्रहण करेल. फ्लाेरेन्स नाइटिंगेलने लहानपणीच तिच्या बहिणीने खराब केलेल्या बाहुलीचे विविध भाग शिवून पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला हाेता. हीच फ्लाेरेन्स पुढे जाऊन नर्सिंगची विद्या शिकून नर्सिंग क्षेत्राची प्रणेता ठरली. म्हणूनच म्हणतात, ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.’
5. मृत्यू : हे जीवनातील अटळ सत्य आहे.प्रत्येकालाच त्याला सामाेरे जावे लागते; परंतु मृत्यूची वेळ सुनिश्चितच असते. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी प्रत्येकाला मनुष्यजन्म मिळताे आणि ते कार्य संपताच त्याला या जगाचा निराेप घ्यावा लागताे.