पत्र छत्तिसावे
माझे गुरू किती प्रेमळ, किती शुद्ध, किती सात्विक, किती दयाळू, किती ममताळू, किती कनवाळू- अशा त्या माझ्या मातेला- माझ्या माऊलीला असली घाण कुजकट, अमंगल दारू- अर्पण करू? त्यापेक्षा मीच दारू साेडलेली काय वाईट? हा विचार इतका प्रबळ झाला कीत्यानी दारूचा ग्लास फेकला, ग्लास फुटला-आणि त्यांचा दारूचा नाद सुटला.तू जे जे कर्म करशील ते ते कृष्णाला अर्पण करून कर म्हणजे तुझ्या हातून वाईट कर्म हाेणार नाही व जे कर्म हाेईल त्याची किंमत खूप वाढेल.ह्या अध्यायाच्या शेवटी कामक्राेधाबद्दल सांगण्यात आले आहे. हे फार बलवान आहेत. तुझ्या अंत:करणात दिव्यश्नती आहे. त्याचा शाेध व बाेध घेण्याचा प्रयत्न कर. त्या दिव्यश्नतीचा स्पर्श झाला म्हणजे कामक्राेधानी तुझ्यावर ताबा मिळवण्याच्या ऐवजी तूच त्यांच्यावर ताबा मिळवशील.
(4) ज्ञानकर्म संन्यासयाेग(5) संन्यासयाेग चाैथ्या अध्यायाचे नाव आहे ज्ञानकर्म संन्यासयाेग, तर पाचव्या अध्यायाचे नाव आहे संन्यासयाेग. काही ठिकाणी पाचव्या अध्यायाचे नांव कर्मसंन्यासयाेग असे दिले आहे.कर्मसंन्यास करणेचा परंतु ताे ज्ञानयु्नत पाहिजे. गीतेमध्ये संन्यास हा शब्द संसार साेडून भगवी वस्त्रे नेसणे ह्या अर्थी वापरलेला नाही. संसारात देखील तुला संन्यास करता येईल.
गीता म्हणजेकाम्यकर्माचा न्यास म्हणजे संन्यास. फळाची अपेक्षा न करता जर तू कर्तव्यकर्म करू लागलीस तर तू संन्यासी झालीस (काम्यांना कर्माणांन्यासं संन्यासं कवयाे विदु:) निष्काम कर्म- कृष्णार्पण कर्म-हा तर गीतेचा पाया आहे.निष्काम कर्माशिवाय ज्ञानयाेग साध्य हाेत नाही, कर्मयाेग साध्य हाेत नाही किंवा भ्नतीयाेग साध्य हाेत नाही.तू असे लक्षात घे की गीतेने कर्म हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरला आहे. निजणे, बसणे, खाणे, पिणे, इतकेच काय श्वासाेश्वास घेणे म्हणजे देखील कर्म आहे. ह्या अर्थाने पाहता काेणीही मनुष्य जन्मभर कर्म करणारच. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावरदेखील मनुष्य व्यापक अर्थाने कर्म करणारच.गीतेची सारी मदार अकर्मावर आहे. अकर्म म्हणजे कर्मशून्यता नव्हे
(1) जेव्हा आपला अहंकार गळून पडताे,
(2) जेव्हा कर्मफळाची आस्नती नाहीशी हाेते.
(3) जेव्हा आपण तृप्त हाेताे आणि
(4) जेव्हा आपण देवाला शरण जाताे.
तेव्हा आपण जे कर्म करताे त्याला गीता अकर्म म्हणते.(कर्मण्यभिप्रवृत्ताेऽपि नैव किंचित्कराेति स:।) अकर्माचा हा चाैरंग तू नीट समजून घे.या चाैरंगावर बसून जे जे कर्म आपण करताे त्या कर्माला गीतेच्या परिभाषेत अकर्म असे म्हटले आहे. अकर्म हे कर्म आहे पण ते अशा प्रकारचे कर्म आहे. अकर्म हे शुद्ध सात्विक, भाै्नितक, उच्च, उदात्त, उत्तुंग, वंदनीय, कमनीय कर्म आहे.अकर्म हीच खरी ईश्वराची आराधना आहे.भगवान कृष्ण म्हणतातज्ञानयाेग काय किंवा कर्मयाेग काय एकच, हे ज्याला समजले ताे शहाणा(एकं सांख्यं च याेगं च य: पश्यति स पश्यति) तसं पाह्यलं तर श्रीखंड व बासुंदी भिन्न आहेत. नाम, रंग, रुचि वगैरे बाबतीत भिन्नता आहे. पण खाेलवर पाहिले म्हणजे कळून येते की