ओशाे - गीता-दर्शन

    12-Jan-2023
Total Views |
 
 

Osho 
 
दुःख हा सुखाचा अनिवार्य पैलू आहे. दुःख साेडायची आपली तयारी आहे. पण आपण त्यातून मु्नत हाेऊ शकत नाही.कारण सुख साेडायची आपली तयारी नाहीये.म्हणून मी आपणास असे सांगू इच्छिताे की, सुखातील ्नलेश समजून घ्या. सुखाचे पूर्ण रूप समजावून घ्या. प्रत्येक सुखामागे लपलेले दुःख समजून घ्या. प्रत्येक सुखाच्या फसवणुकीबाबत जागे व्हा. माणसाला पुनः नव्या दुःखात पकडण्याचं सुख हे एक फ्नत एक जाळं आहे. फ्नत प्रलाेभन आहे. जाेवर सुखाबाबतची एवढी जाग येत नाही, ताेवर आपण किनाऱ्यावर उभे राहू शकणार नाही.लाओत्से म्हणत असे, ‘जेव्हा काेणी माझा सन्मान करण्यासाठी येतं, तेव्हा मी म्हणताे माफ करा, हा सन्मान घेणं काही मला जमायचं नाही.
 
कारण मला अपमानाची इच्छा नाहीये.’ पण ती माणसं म्हणतात की, ‘पण आम्ही तर आपला सन्मान करू इच्छिताे.’ मग लाओत्से म्हणताे, ‘आपण सन्मान करायला आलात आणि मी ताे घ्यायला तयार झालाे, तर अपमान कुठेतरी जवळपासच घुटमळत असणार. ताे जवळ यायला लागेल. कारण हे दाेघे वेगवेगळे जगत असल्याचे मला ठाऊक नाही. ही जाेडी आहे. ते साेबतच असतात. एकमेकांच्या जवळ. त्यांच्यात डायव्हाेर्स कधी हाेत नाही. यांची जाेडी सदाच एकत्र नांदत असते. त्यांच्यात कधी घटस्फाेट हाेत नसताे. माझ्यावर कृपा करा अन् माझ्या अपमानाला निमंत्रण देऊ नका. आपण देऊ केलेला सन्मान परत घेऊन जा.’