चाणक्यनीती

    12-Jan-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
4. माेक्ष : परमेश्वरी साक्षात्कार ‘काेऽहं’ चे उत्तर ‘साेऽहं’ हे समजण्याच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे आत्म्याचे परम ात्म्यात विलीन हाेणे म्हणजेच माेक्ष! सर्व पुरुषार्थ साधल्यानंतर आत्माेन्नती साधून हा चाैथा पुरुषार्थ म्हणजे ‘माेक्ष’ मिळविता येताे.
 
बाेध : प्रत्येकाला चारही पुरुषार्थ साधणे अत्यंत कठीण आहे; अगदी एक जरी साधायचा म्हटला, तरी त्यासाठी मनाला एक प्रकारची शिस्त, वळण असणे गरजेचे आहे. म्हणून प्रयत्न करत राहावे; आज ना उद्या काही न काही प्रगती निश्चितच हाेईल. एका नाहीतर दुसऱ्या, दुसऱ्या नाहीतर त्यापुढील अशा काेणत्यातरी जन्मात ‘माेक्षप्राप्ती’ हाेऊ शकेल; पण प्रयत्नच केले नाही तर मात्र जन्म-मरणाचा ेरा कधीच चुकणार नाही. मनुष्य जन्मातील वेदना- यातना, सारे भाेग यातून मुक्ती मिळणार नाही.कारण या ेऱ्यातून मुक्ती मिळविण्यासाठीच मानवजन्म मिळत असताे. ताे प्रत्येक मनुष्यानेच सार्थ करावा.