चाणक्यनीती

    11-Jan-2023
Total Views |
 
 
 

Chanakya 
2. अर्थ : अर्थ म्हणजे धन. सन्मार्गाने धन प्राप्त करणे, स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी त्याचा व्यय करणे हा दुसरा पुरुषार्थ हाेय. धन मिळविणे म्हणजेच धनाचा ‘लाेभ’ ठेवणे नव्हे. पैसा हा माणसासाठी असताे; माणूस पैशांसाठी नव्हे! हे सूत्र जगताना नेहमीच लक्षात ठेवावे.
 
3. काम : काम म्हणजे इच्छा. इच्छा अनंत असतात. एक पूर्ण केली, तर दुसरी पुढे येते; पण यात आवश्यक तेवढ्याच इच्छा पूर्ण कराव्यात. शरीराच्या पाेषणासाठी अन्न, शरीर झाकण्यासाठी वस्त्र, निवाऱ्यासाठी चांगले घर आणि संततीसाठी, वंश पुढे नेण्यासाठी विवाह.थाेडक्यात, इच्छांवर नियंत्रण असावे.