उपाय एक भगवद्भ्नती । भजन करावे येथानुश्नती ।।1।।

    08-Sep-2022
Total Views |
 
 

saint 
सत्त्वगुणाच्या खालची पायरी म्हणजे रजाेगुण हाेय. रजाेगुणी माणसातही क्रमवारी असू शकते. शुद्ध रजाेगुणी माणसे सत्त्वगुणाच्या जवळ पाेचलेली असतात. एकाच वर्गात ज्याप्रमाणे हुशार, मध्यम आणि ढ मुले असतात, त्याप्रमाणेच सत्त्चगुण, रजाेगुण आणि तमाेगुण प्रवृत्ती असतात. मध्यम बुद्धीचा मुलगा जसा थाेडा कमी टीव्ही पाहून आणि जास्त वेळ व मनापासून अभ्यास करून हुशार मुलांच्यात जाऊ शकताे तशीच रजाेगुणी माणसे प्रयत्नपूर्वक विवेकबुद्धी धारण करून, भगवंताची भक्ती करून सत्त्चगुणी बनू शकतात. आपण सामान्य प्रपंची माणसे बव्हंश: रजाेगुणी असताे. म्हणजे आपला प्रपंच नीट चालावा, त्यात न्यून नसावे, पुरेसा पैसाअडका असावा, मुलेबाळे हुशार निघावीत, तब्येत मस्त राहावी.
 
सुखाेपभाेगासाठी सर्व साधने, टी.व्ही., ्रीज, गाडी, बंगला सर्व असावे. आपल्याला सर्वांनी चांगले म्हणावे आणि महत्त्वाचे म्हणजे ही सर्व सुस्थिती कायम टिकावी. त्यात बिघाड हाेऊ नये. नाटक, सिनेमा, गाणे बजावणे याचा आनंद मिळत राहावा; स्नेही साेबती यावेत, त्यांच्याशी गप्पा रंगवाव्यात. त्यात इतरांच्यावर टीकाटिप्पणी करावी.विनाेद करावेत, खूप खेळावे असे वाटणे हा रजाेगुणच आहे. मात्र त्यात दुसऱ्याचे अहित व्हावे हा तामसीपणा व दुष्टबुद्धी नसते म्हणूनच ताे तमाेगुण हाेत नाही.आता या सर्व ऐहिक सुखाेपभाेगातच रंगून आणि गुंतून गेल्यामुळे रजाेगुणी माणसाला या भाैतिक गाेष्टींच्या पलीकडे काही आत्मज्ञान आणि परमसुख आहे, आपण परमेश्वराचे अंश आहाेत, यापैकी कशाचीच जाणीव नसते. त्याच्या मनात ही जागृती करणे हेच तर श्रीसमर्थांचे उद्दिष्ट आहे.