कांही तरी धरावी साेये । अगांतुक गुणाची ।।2।।

    29-Sep-2022
Total Views |
 
 
 

saint 
या सर्वांमुळे त्याचे व्यक्तिमत्त्व कसे सर्वांगाने परिपूर्ण हाेते ते सांगताना श्रीसमर्थ म्हणतात की ताे यशवंत, किर्तीवंत, शक्तीवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत आणि सत्यवंत हाेताे आणि सदैव चांगली कृत्ये करत राहताे. विद्यावंत, कुळवंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत आणि बळवंत असूनही ताे दयाळू आणि सद्बुद्धीवान असताे. श्रीदासबाेधापूर्वीही समर्थांनी श्री. छ. शिवाजी महाराजांचा शके 1581 मध्ये जाे पत्र लिहून गाैरव केला आहे त्यातही त्यांचा - यशवंत कीर्तीवंत। सामर्थ्यवंत वरदवंत। पुण्यवंत नितीवंत। जाणता राजा।। या शब्दातच केलेला गाैरव पाहिला की, श्रीसमर्थांचे शब्दप्रभुत्व पाहून आदर द्विगुणित हाेताे.
 
या समासाचा उपसंहार करताना श्रीसमर्थ म्हणतात की, ही सद्विद्येची लक्षणे म्हणजे उत्तम गुणच आहेत आणि श्राेत्यांनी त्यांचा अभ्यास करून ती अंगी बाणवून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. याचबराेबर श्रीसमर्थ आणखी एक अतिशय महत्त्वाचे आणि मनाेज्ञ सत्य तत्त्व सांगतात. ते म्हणतात की, रूप व लावण्य हे नैसर्गिक गुण माणसाला जन्मजात प्राप्त हाेतात त्यावर माणसाचा उपाय नसताे आणि त्यात ताे प्रयत्नाने बदलही करू शकत नाही; परंतु हे उत्तम गुण असे आहेत की काेणीही कसाही जन्माला आला तरी ताे प्रयत्नाने आणि विवेकाने हे गुण प्राप्त करून घेऊ शकताे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने तसा प्रयत्न करण्यातच त्याचे हित आहे! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299