परहितकारी परशाेकहारी । पुरुषार्थे जगमित्र ।।2।।

    27-Sep-2022
Total Views |
 

saint 
 
सर्वांशी साैजन्यपूर्ण आणि निरपेक्ष वागल्यामुळे ताे सर्वांनाच हवाहवासा वाटताे आणि जणू आपला जिवलग मित्र आहे असे वाटत असते.त्याचे बाेलणे कसे असते याचे वर्णन करताना श्रीसमर्थ म्हणतात की नेहमी सत्य, शुभ, काेमलपणे आणि ऐकणाऱ्याला सुख आणि संताेष वाटेल असेच ते बाेलत असताे.ताे प्रभु रामचंद्राप्रमाणे एकवचनी म्हणजे जे बाेलेल त्याचप्रमाणे वागणारा आणि दिलेले वचन कदापिही न माेडणारा असताे. त्याचे संपूर्ण वागणे परमशुद्ध असते. पैशांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत, त्याची वागणूक नीतीधर्माची असते. प्रपंचातील वर्तणूक आणि परमार्थमार्गातील वर्तणूक या दाेन्ही बाबतीत ताे सदैव निर्मळपणे, शुद्घपणे आणि पवित्रपणे वागून जनतेपुढे आदर्श वस्तुपाठ देत असताे.
 
असा पुरुष काेणत्या सद्गुणांमुळे जगमित्र असताे ते वर्णन करणारी श्रीसमर्थांची ओवी अतिशय प्रसिद्ध आहे. ते म्हणतात ताे सर्वांशी स्नेहाने वागून सदैव इतरांचे कल्याण करीत असताे आणि त्याच्या मधुर शब्दांनी आणि पवित्र वाणीने ताे इतरांना दु:खमुक्त करीत असताे. स्वपराक्रमाच्या जाेरावर ताे अन्यायपीडितांना अन्यायापासून मुक्त करताे आणि त्याच्या अंगच्या कर्तृत्व, स्नेहशीलता, मधुर वाणी व पराक्रम या पुरुषार्थाच्या गुणसमुच्चयामुळे सर्वांना हवाहवासा वाटणारा जगमित्र हाेताे.
-प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299