पर द्रव्य पर नारी । यांचा घरी विटाळ ।।1।।

    26-Sep-2022
Total Views |
 
 

saint 
 
भाैतिक सुखाच्या प्राप्तीसाठी बऱ्याचवेळा नकाे ते करावे लागते. भाैतिक सुख हा विषय अमर्याद आहे. या अमर्याद विषयामध्ये इंद्रिय सुखाचा समावेश हाेताे. नितीनियमानुसार इंद्रिय सुख मिळवले तर सुख समाधान आहे.मात्र इंद्रियांचे लळे पुरवून सुख मिळवायचे ठरवले तर दु:ख आहे; पण भाैतिक सुखाला जाे व्यक्ती खरे सुख समाधान मानताे त्याला इंद्रिय सुखापासून दुरावणे कधीही पटणारे नसते.खा, प्या ऐश करा अशी मनाेवृत्ती जाेपासणारा माणूस आत्मसुखाकडे पाहू शकत नाही. आत्मसुख ही परीभाषा भाैतिक सुखाचा विचार करणाऱ्यांना पटतही नाही. इंद्रियांचे लळे पुरविण्यासाठी त्याला परद्रव्य, परनारी आपलेच वाटू लागतात.
 
त्यांच्या प्राप्तीसाठी ताे नितिनियमाला सहज पायदळी तुडवताे. पण ज्याला आत्मज्ञानाचा मार्ग सापडला आहे, ताे पर द्रव्यावर, पर नारीवर स्वप्नातही मन जाऊ देत नाही, त्याला जणू या दाेन्हीचा विटाळच असताे. त्याची ही मनाेवृत्ती त्याच्या घरात खऱ्या सुख समाधानाला जन्म देते. या अनुषंगाने बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, परद्रव्य परनारी । त्यांचा घरी विटाळ ।। जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448