अर्थात त्यांना अभिप्रेत मंत्री म्हणजे त्याकाळचा अमात्य आहे; आजच्या काळातील मंत्री, उपमंत्री, मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री नव्हे, पण तरीही त्यांचे अनुमान आजच्या मंत्र्यांना आणि सत्ताधीशांनाही सारखेच लागू आहे हे निर्विवाद! ताे बहुश्रुत असूनही सज्जन, तत्त्वज्ञ असूनही उदासीन आणि उत्तम गायक असूनही भगवंताच्या भजनांत रंगून जाणारा असताे. गायक मंडळी सहसा सुखाेपभाेगी विलासी व ऐहिकांत गुंतणारी असतात.
त्याला सद्विद्यावान गायक अपवाद असताे. कार्यकर्ता हा शब्द सध्या आपण फार वेळा वापरताे आणि अनेकदा गंमतीने ‘‘काय बी करताे ताे कार्यकर्ता’’ असे म्हणताे. पण हा शब्द श्रीसमर्थांच्या काळात चांगल्या अर्थानेच वापरला जायचा.विविध चांगल्या कार्यासाठी तन मन धनाने सदैव झिजणारी निर्लाेभी व्यक्ती म्हणजे कार्यकर्ता अशी त्यांची धारणा हाेती. असा कार्यकर्ता अनेक चांगली कामे करूनही जेव्हा त्यांचा अभिमान न धरता निराभीमानी असताे, तेव्हा त्याला सद्विद्या प्राप्त झाली आहे असे श्रीसमर्थ सांगून सद्विद्येचे महत्त्व वर्णन करीत आहेत! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299