विदेसी मेले मरणें । तयास संस्कार देणे । अथवा सादर हाेणे । ताे सत्त्वगुण ।। अर्थात जर परिसरात एकदा विदेशी बेवारस माणूस मरण पावला तर सत्त्चगुणी माणूस त्याच्या अंत्यसंस्काराला मदत करताे आणि वेळप्रसंगी स्वत: पुढाकार घेऊन अंतिम संस्कार पार पाडताे.खराेखर इत्नया सूक्ष्म अवलाेकनाने शिकवण देणारा श्रीसमर्थांसारखा संत मिळणे दुष्प्राप्य आहे. विशेष म्हणजे येथे ते स्वजातीचा वगैरे उल्लेख करीत नाहीत. कारण इथूनतिथून सर्व माणसे मग ती काेणत्याही जातीतील असाेत सारखीच आहेत. माणूस आणि माणुसकी हीच महत्त्वाची आहे; हाच त्यांचा अनमाेल संदेश आहे.या समासाचा उपसंहार करताना ते म्हणतात की, असा सत्त्चगुणी माणूस दुसऱ्याचा नावलाैकिक आणि कीर्ती यामुळे आनंदी हाेताे आणि दुसऱ्याला काेणी नावे ठेवली तर त्याला दु:ख हाेते.
दुसऱ्याच्या दु:खाने ताे कष्टी हाेऊन ते दु:ख हलके करावयाचा सर्वताेपरी प्रयत्न करताे. विरागी व्यक्ती व साधुसंत यांच्या दर्शनाने ताे उल्हसित हाेताे.सारांशाने ज्याचे मन देवाधर्माकडे लागले असून ताे मनात काेणतीही कामना न धरता भक्ती करताे ताे सत्त्वगुणी हाेय. त्यामुळे त्याला भक्तीसुखाचा व सत्य ज्ञानाचा लाभ हाेऊन भवसागरातून तरून जाण्याची शक्ती प्राप्त हाेते आणि ताे जीवनमुक्त हाेऊन परमाेच्च ज्ञान प्राप्त करून परब्रह्माशी एकरूप हाेऊन जीवनाचे सार्थक करून घेताे. म्हणून आपण सर्वांनीच सत्त्वगुणी हाेण्याचा मनापासून आणि बुद्धी आणि विवेक यांच्या आधाराने प्रयत्न केलाच पाहिजे! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299