चाणक्यनीती

    09-Dec-2022
Total Views |
 

chanakya 
 
2. स्त्री : स्त्री ही रंग, रूपाने आकर्षक असली, तरी तिच्या स्वभावाने ती सर्वांना प्रिय हाेते. पतिव्रता ही पती, त्याचे नातेवाइक, घर इ. सर्वांसाठी कष्ट करते, पतीला नेहमी सुखी ठेवते म्हणून तिचा खरा गुण तिचे पातिव्रत्य हाेय. अशावेळी पतिव्रता कुरूप असली, तरी ती आदरणीय, प्रभावशाली व सर्वांची आवडती बनते.
 
3. तपस्वी : व्रतस्थ राहून, कठाेर नियमांचे पालन करून व्य्नती मनावर, भावभावनांवर विजय मिळविते; अनेक सिद्धी प्राप्त करते आणि ‘तपस्वी’ म्हणून नावारूपाला येते.क्षमा हे ‘तपस्वी’ असणाऱ्यांचे भूषण असते.चुकणाऱ्याला संतापून शाप न देता; त्याला क्षमा करणारा तपस्वीच खरा तपस्वी. दुर्वास ऋषींसारखे तपस्वीदेखील प्रसिद्ध आहेत; पण संतापून शाप देण्यासाठी.