म्हणउनी शांती धरा । उतराल पैल तिरा ।।2।।

    08-Dec-2022
Total Views |
 

saint 
 
संसाराला काेणी काहीही नांव ठेवाे, पण या मायानदीतून पैलतीराला सुखरूप पाेहचावे, हे सर्वांचे जीवन ध्येय असायला पाहिजे, यात मात्र काेणाचे दुमत नसावे. संसाराच्या मायानदीत सहजासहजी पाेहता येत नाही.कारण या नदीत माया, माेह, स्वार्थ, अहंकार, काम, क्राेध, मीपणा, द्वेष, मत्सर आदीचे खूप माेठमाेठे भाेवरे, खाचखळगे, लाटा, कपाऱ्या आहेत. यामुळे आपण कुठेही सहज गटांगळ्या खाऊन बुडू शकताे. पण, जेव्हा आपल्या लक्षात येते की, इंद्रिय लळे, भाैतिक सुख हे खरे सुख नाही. त्यामुळे यांच्या मागे लागण्याचे कारण नाही. आपली अशी मनाेवृत्ती निर्माण हाेताच या मायानदीचा पूर ओसरू लागताे. म्हणजेच या नदीत पाेहावे लागत नाही, तर सहज चालत जाता येते, हे आपल्या लक्षात येते.
 
आपण जेव्हा दृढ निश्चयाने संसाराच्या या मायानदीतून चालू लागताे तेव्हा कपऱ्या, भाेवरे, खाच खळगे यापैकी कांहीही आपणाला अडसर ठरत नाहीत.कारण हे सर्व आपण निर्माणच हाेऊ दिलेले नसते किंवा निर्माण झाले असले तरी दृढनिश्चयाने ते आपण नष्ट केलेले असते. थाेडक्यात मायानदी, निर्माण करणे किंवा नष्ट करणे हे आपल्याच हाती आहे, हे लक्षात ठेवावे.संसारात राहून मायानदी पार करणे अवघड नाही हेही लक्षात ठेवावे. जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448