चाणक्यनीती

    08-Dec-2022
Total Views |
 
 

chanakya 
 
वाच्यार्थ: काेकिळेचे रूप तिचा स्वर आहे.पतिव्रता असणेच स्त्रियांचे साैंदर्य आहे.कुरूप लाेकांचे ज्ञान हेच त्यांचे रूप आहे, तथा तपस्व्यांची क्षमाशीलताच त्यांचे रूप आहे.
 
भावार्थ : वरील श्लाेकात काेणाचे साैंदर्य कशात आहे, हे चाण्नयांनी सांगितले आहे.
 
1. काेकिळ : काेकिळ पक्षी रंगाने काळा असताे. रंग, रूपाने सुंदर असणारे बरेच पक्षी आहेत; जसे हंस, माेर, पाेपट इ. कावळा हा देखील काेकिळ पक्ष्याप्रमाणेच काळा असताे; पण काेकिळ सर्वांना आवडताे. वसंतऋतूत काेकीळ आपल्या गाेड आवाजात ‘कूऽ ऽऽ ऽ’ म्हणताे तेव्हा मन एका वेगळ्याच स्वप्नमय दुनियेत जाते. त्याचा मंजुळ सुस्वर हेच त्याचे साैंदर्य!