ऐसी मर्यादा लाविली देवे। म्हणाैन नीतीने वर्तावे ।।2।।

    07-Dec-2022
Total Views |
 
 

saint 
थाेड्नयात नीतीधर्म साेडून अनीतीने आणि अन्यायाने वागत राहताे आणि जे करू नये ते करताे. स्वत:साठी दुसऱ्याचा घात करण्यासही कचरत नाही, मानमर्यादा साेडून वागताे. या सर्व पापांचा आणि दाेषांचा परिणाम म्हणून त्याला मृत्यूनंतर अतीव दु:खदायक अशा यमयातना भाेगाव्या लागतात.गावाचा पाटील चुकला तर त्याला जसा राजा शिक्षा करताे, तसेच जर खुद्द राजाने पापे केली तर त्याच्या मृत्यूपश्चात यमधर्म न्यायनिवाडा करून सजा करताे, असे सांगून श्रीसमर्थ या यमयातना किंवा नरक यातना कशा असतात, त्यात मारहाण, तापलेल्या तेलात टाकणे, चटके देणे अशा अनेक दु:खदायक शिक्षांचे वर्णन करतात. या सर्व आधिदैविक तापातून मुक्ततेचा उपायही ते सांगतात.
 
माणसाने नीती आणि न्यायाने वागून आपले जीवन व्यतीत करावे यासाठीच परमेश्वराने सद्वर्तनाच्या मर्यादा घालून दिल्या आहेत.त्याचे पालन केले नाही तर यमयातना भाेगाव्या लागतात; परंतु विवेकशील वागून मर्यादा राखल्या तर मात्र या अधिदैविक तापापासून माणूस मुक्तता मिळवू शकताे. असे तिन्ही प्रकारच्या तापांचे वर्णन येथे पूर्ण करताना श्रीसमर्थ सांगतात की, हे तिन्ही ताप टाळून मानवी जन्म सफल करण्यासाठी सुयाेग्य वागणे, सन्मार्गाला लागणे आणि परमेश्वराची भ्नती करणे हाच एकमेव मार्ग आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299